Advertisement

आरटीई प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी संपल्यानंतरही शाळेत जागा रिक्त असल्यास व अर्ज शिल्लक असतील तर पुन्हा सोडत काढून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील.

आरटीई प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर
SHARES

बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार (आरटीई ) अंतर्गत खासगी इंग्रजी शाळेतील आरक्षित २५ टक्के जागासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक राज्य शिक्षण विभागानं जाहीर केलं आहे. आरटीई प्रवेशासाठी ९ फेब्रुवारी २०२१ पासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. प्रवेशाची पहिली सोडत ही ५ मार्चला काढण्यात येणार आहे.

वेळापत्रकानुसार ९ ते २६ फेब्रुवारी दरम्यान पालकांना अर्ज करायचे आहे. ५ मार्च १ रोजी आरटीई जागांची लॉटरी काढण्यात येणार आहे. अर्ज निवडण्यात आलेल्यांच्या पालकांनी ९ ते २६ मार्च २०२१ रोजी आपल्या कागदपत्रांची पडताळणी करायची आहे.  त्यानंतर प्रतीक्षा यादी जाहीर हाेणार आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना चार टप्प्यात प्रवेश घेता येणार आहे.

पहिला टप्पा २७ मार्च ते ६ एप्रिल, दुसरा १२ ते १९ एप्रिल, तिसरा २६ एप्रिल ते ३ मे आणि १० ते १५ मे हा चौथा टप्पा असणार आहे. यंदा एकच लॉटरी काढण्यात येणार असून शाळेच्या रिक्त जागेच्या संख्येइतकीच प्रतिक्षा यादी राहणार आहे.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी संपल्यानंतरही शाळेत जागा रिक्त असल्यास व अर्ज शिल्लक असतील तर पुन्हा सोडत काढून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक द.गो. जगताप यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.



हेही वाचा -

महिनाअखेरीस महाविद्यालये होणार सुरू?

लसीकरणासाठी महापालिकेनं दिली 'ही' सवलत



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा