Advertisement

क्रॉस रोड पालिका शाळेत पहिल्याच दिवशी शालेय वस्तूंचे वाटप


क्रॉस रोड पालिका शाळेत पहिल्याच दिवशी शालेय वस्तूंचे वाटप
SHARES

दोन महिन्यांची सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुवारी मोठ्या उत्साहात शाळेत प्रवेश केला. शाळेची पहिली घंटा, तेथील शिस्त, कोऱ्या वह्या, पुस्तकांचा दरवळ सर्वच विदयार्थ्यांचे लक्ष वेधून घेत होते. शाळेची हीच शिस्त आणि शिक्षणातील गोडी कायम राहावी यासाठी महापालिकेच्या शिवडी क्रॉस रोड शाळेत प्रवेशोत्सव आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात शाळेच्या पहिल्याच दिवशी विदयार्थ्यांना नगरसेविका सुप्रिया मोरे यांच्या हस्ते शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक मेमूना लकडावाला, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

शाळा संकुलात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण 695 विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल इतके शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. या साहित्यामध्ये इयत्तेनुसार पुस्तके, दप्तर, पाण्याची बाटली, कंपास पेटी, जेवणाचा डबा, रेनकोट, बूट अशा एकूण 27 वस्तूंचा समावेश होता.

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. तरीही जे पालक आपल्या मुलांना महापालिकेच्या शाळांमध्ये शिकण्यासाठी पाठवतात, अशा विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचणींचा त्रास सहन करावा लागू नये, म्हणून महापालिकेकडून अशा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवले जाते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा