गरिबांना मदत करण्यासाठी कॉलेज विद्यार्थ्यांचा पुढाकार

 Andheri

See all

अंधेरी - गरीब-गरजूंना मदत करण्यासाठी अंधेरीच्या तोलानी महाविद्यालयातील रोटरॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. रोटरॅक्ट क्लबचे विद्यार्थी तक्षशिला परिसरातील घराघरात जाऊन वर्तमानपत्राची रद्दी जमा करत आहेत. तसेच ही रद्दी विकून जे पैसे जमा होतील त्याचा उपयोग ते गोरगरिबांसाठी करणार आहेत. या विद्यार्थ्यांनी 100 हून अधिक घरात जावून सुमारे 250 ते 300 किलो इतकी रद्दी जमा केली आहे. लवकरच ही रद्दी विकून या रकमेचा वापर सुसंकृत आणि प्रगतशिल समाजासाठी करणार अशी प्रतिक्रिया तोलानी महाविद्यालय रोटरॅक्ट क्लबचे सदस्य जयनम गाला यांनी दिली.

Loading Comments