Advertisement

माध्यमिक शिक्षकांना हवी कार्यरजा, चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी मिळेल प्रोत्साहन


माध्यमिक शिक्षकांना हवी कार्यरजा, चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी मिळेल प्रोत्साहन
SHARES

राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांप्रमाणे आता कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनाही विविध चर्चा सत्रांमध्ये संशोधन अहवाल वाचण्यासाठी अथवा उपस्थित राहण्यासाठी कार्यरजा मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षकांनाही ही सवलत मिळावी. यासाठी २८ फेब्रुवारीच्या शासन निर्णयात दुरुस्ती करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.


गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न

वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक ज्याप्रमाणे विविध चर्चासत्रांना उपस्थित राहतात. त्याचप्रमाणे माध्यमिक विभागातील शिक्षकसुद्धा विविध विषयांच्या कृतीसत्रात सहभागी होतात तिथे शोध निबंध सादर करतात. तरीही त्यांची उपस्थिती शिक्षण विभागाकडून सेवाकाळ म्हणून ग्राह्य धरला जात नाही.

दरवर्षी मराठी, इंग्रजी व गणित तसेच इतर विषय संघटनांच्या कृतीसत्रात शिक्षक आपले शोध निबंध सादर करून शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी आपल्या हक्कांच्या रजांवर पाणी सोडून गुणवत्तवाढीचे कार्य करीत असतात. त्यामुळे त्यांनाही कार्यरजा मिळावी यासाठी शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्र्यांसह शिक्षण उपसचिव यांच्याकडेही त्वरित शुद्धीपत्रक काढण्याची मागणी केली आहे.


माध्यमिक शिक्षकांवर अन्याय

२८ फेब्रुवारी रोजीच्या शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयात कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना अशा कृतीसत्रात सहभागी होण्यासाठी कार्यरजा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु या जीआरमध्ये माध्यमिक शिक्षकांचा उल्लेख न केल्याने माध्यमिक शिक्षकांवर अन्याय झाला आहे. मागील २ वर्षांपासून शिक्षक परिषद याबाबत पाठपुरावा केला असून माध्यमिक शिक्षकांनाही ही सवलत देण्याची मागणी केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा