Advertisement

विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच शिक्षण द्या - सोनम वांगचुक

महाराष्ट्रातील सरकारी शाळांची स्थिती अत्यंत खराब असून ती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारची प्रगती करू शकत नाही, असं मत शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी शनिवारी झालेल्या सन्मान सोहळ्यात व्यक्त केलं.

विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच शिक्षण द्या - सोनम वांगचुक
SHARES

शिक्षणात सुधारणा होणं ही काळाची गरज असून मुलांना देण्यात येणारं शिक्षण भौगोलिक स्थिती यावर अवलंबून असतं. मुलांना मिळणारं शिक्षण हे सांघिक प्रयत्न करताना मातृभाषेतून मुलांनी शिक्षण घ्यावं यासाठी आपण आग्रही असणं आवश्यक आहे.  गेल्या ३० वर्षापासून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात काम करीत असताना बदलत्या शिक्षणपद्धतीनं काम करता येऊ शकतात. 

तसंच महाराष्ट्रातील सरकारी शाळांची स्थिती अत्यंत खराब असून ती जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारची प्रगती करू शकत नाही, असं मत शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी शनिवारी ४ ऑगस्ट रोजी झालेल्या सन्मान सोहळ्यात व्यक्त केलं.


सन्मान सोहळा आयोजित 

आशिया खंडातील नोबल पुरस्कार म्हणून समजला जाणार रॅमन मॅगसेसे पुरस्कार २०१८ हा शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी या दोन भारतियांना जाहीर झाला. या निमित्तानं शालेय शिक्षण व क्रीडा आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्यावतीनं शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, उच्च व तंत्रशिक्षण सचिव सौरभ विजय, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांसह विविध विदयापीठांचे कुलगुरुही उपस्थित होते.


ब्रॅड अॅम्बॅसेडरचं काम करावं

सध्या शिक्षण क्षेत्रात बरेच बदल होत असून येत्या काळात महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला सोनम वांगचुक व डॉ. भरत वाटवानी यांच्या सारख्यांची गरज आहे. येत्या काळात समाजातील प्रत्येकात भावनिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी दोघांनीही ब्रॅड अॅम्बॅसेडर म्हणून काम करावं. त्यांच्या या कामामुळं अनेकांना प्रेरणा मिळेल असं आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.


मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करताना सुरूवातीला वेगळं काम करतोय याचा त्रास झाला. पण समाजात राहणाऱ्या एका व्यक्तीला तरी आपण बरं करू या विश्वासानं काम सुरू केलं होतं. सध्या वेगवेगळे आजार अनेकांना होत असतात, परंतु आपण मानसिक रूग्ण आहोत हे आपल्याला पटकन समजत नाहीत. किंवा आपलं मन या गोष्टी मानायला पटकन तयार होत नाही. त्यामुळं अशा प्रकारच्या आजाराबाबत धडे व त्याची संपूर्ण माहिती आजच्या शालेय अभ्यासक्रमात देणं गरजेच आहे.
- डॉ.भरत वाटवानी



हेही वाचा -

'लॉ' शाखेचे आणखी तीन निकाल जाहीर

अकरावी प्रवेशप्रक्रियेत पुन्हा गोंधळ, विद्यार्थ्यांचे आयडी ब्लॉक




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा