Advertisement

'लॉ' शाखेचे आणखी तीन निकाल जाहीर

शनिवारी तीन वर्ष एलएलबी पदवी अभ्यासक्रमाच्या सेमिस्टर पाच व सहा, तर पाच वर्ष एलएलबीचे सेमिस्टर नऊ व दहा या चार महत्त्वांच्या निकालांची घोषणा मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळातर्फे करण्यात आली.

'लॉ' शाखेचे आणखी तीन निकाल जाहीर
SHARES

बऱ्याच दिवसांपासून निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या लॉ शाखेच्या विद्यार्थ्यांना शनिवारी काहीसा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून निकालाकडं डोळे लावून बसलेल्या एलएलबी अभ्यासक्रमाचे चार निकाल शनिवारी जाहीर करण्यात आले.


७१८ विद्यार्थी उत्तीर्ण 

शनिवारी तीन वर्ष एलएलबी पदवी अभ्यासक्रमाच्या सेमिस्टर पाच व सहा, तर पाच वर्ष एलएलबीचे सेमिस्टर नऊ व दहा या चार महत्त्वांच्या निकालांची घोषणा मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळातर्फे करण्यात आली. एलएलबी सेमिस्टर पाच या परीक्षेकरीता २ हजार ००५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १ हजार ७३७ विद्यार्थ्यानी ही परीक्षा दिली असून त्यातील ७१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ४३१ विद्यार्थी नापास झाले आहेत.

एलएलबी सेमिस्टर सहा या परीक्षेकरीता ४ हजार २७३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४ हजार १२२ विद्यार्थ्यानी ही परीक्षा दिली असून त्यातील ४४ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, १ हजार ६३१ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर ६४५ विद्यार्थ्यांना पास क्लासनं उत्तीर्ण झाली आहेत. तर १ हजार १२२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.



हेही वाचा - 

अकरावी प्रवेशप्रक्रियेत पुन्हा गोंधळ, विद्यार्थ्यांचे आयडी ब्लॉक

'या' शाळेत सुरू झाली पहिली 'अटल टिंकरिंग लॅब'




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा