दहावीचा ऑनलाईन निकाल मंगळवारी होणार जाहीर!

 Mumbai
दहावीचा ऑनलाईन निकाल मंगळवारी होणार जाहीर!

राज्य शिक्षण मंडळाच्या एसएससी बोर्डाचा ऑनलाईन निकाल अखेर मंगळवारी 13 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयी खोटी माहिती फिरत होती. यापूर्वी 9 जून रोजी निकाल लागणार अशी अफवा पसरली होती. त्यानंतर सोमवारी 12 जून रोजी निकाल लागणार असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. पण आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी निकालाच्या तारखेची घोषणा केल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. शिक्षण मंडळातर्फे यावेळी शास्त्रीय संगीत, नृत्य, वादन तसेच लोककला यांसारख्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत अधिक गुण दिले जाणार आहेत. यंदा राज्यातून एकूण 17,66,098 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. यामध्ये 9,89,908 मुलांचा आणि 7,76,190 मुलींचा समावेश होता.

तुमचा निकाल पहाण्यासाठी या संकेस्थळावर क्लिक करा
- www.mahresult.nic.in
- www.sscresult.mkcl.org
- www.maharshtraeducation.com
- www.knowyourresult.com
- www.rediff.com/exam
- www.jagranjosh.com
तुम्ही आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा, बीएसएनएलधारक असाल तर 58888111 या नंबरवर MAH10 ( स्पेस) द्या आणि तुमचा नंबर टाका. तुमच्या मोबाईवरच निकाल कळू शकेल.

Loading Comments