स्कूल चले हम...

Mumbai
स्कूल चले हम...
स्कूल चले हम...
स्कूल चले हम...
See all
मुंबई  -  

मे महिन्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर गुरुवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. चेहर्‍यावर दिसणारे कुतुहल आणि मनात असणारी भिती...असे वातावरण गुरुवारी प्रत्येक शाळेच्या गेटवर होते. पहिल्या दिवशी मुलांना शाळेत सोडताना पालकांच्या मनातही हुरहूर होती. हे वातावरण मुंबईतील सगळ्याच शाळांमध्ये होते.नवा गणवेश, नवी पाठी, आणि नवी पुस्तके, डब्बा घेऊन मुले गुरुवारी शाळेत जाताना पाहताना मिळाली. काहींच्या चेहऱ्यावर हसू होते तर काहींच्या डोळ्यात पाणी होते. आपल्या मुलांच्या शाळेचा पहिलाच दिवस म्हणून पालक आपल्या लाडक्या चिमुरड्याला शाळेत सोडताना दिसत होते.

राज्यभरात एकूण 1 लाख 3 हजार 685 शाळा आहेत. त्यापैकी 21 हजार 261 अनुदानित, तर 13 हजार 988 विनाअनुदानित शाळा आहेत.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.