Advertisement

सुट्टी संपली...मुंबईतील शाळा सुरू

नव्या शैक्षणिक वर्षात शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करावा, यासाठी ९ जून २०१५ ला दिलेल्या सरकारी आदेशानुसार शुक्रवारी मुंबईसह राज्यभरातील शाळांचा प्रवेशोत्सव होणार आहे. तसंच २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून बहुतांश शाळा हारतुरे, फुगे, फुले यांसारख्या वस्तू घेऊन सजावटीद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यास सज्ज झाल्या आहेत.

सुट्टी संपली...मुंबईतील शाळा सुरू
SHARES

एप्रिल महिन्यापासून सुरू झालेली उन्हाळ्याची सुट्टी अखेर संपली आहे. बऱ्याच दिवस बंद असलेल्या शाळांमध्ये शुक्रवारी १५ जूनपासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट, मधल्या सुट्टीतली मजा, खेळात हरल्यानंतर त्यांचे उडणारे खटके या सर्वांचा आवाज अाता दुमदुमणार आहे. नुकतीच शाळा सुरू झाल्यानं शुक्रवारी विद्यार्थ्यांसोबतच पालकांचाही गोंधळ उडाल्याचं दिसून अालं.


पहिल्या दिवसाचा उत्साह

नव्या शैक्षणिक वर्षात शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करावा, यासाठी ९ जून २०१५ ला दिलेल्या सरकारी आदेशानुसार शुक्रवारी मुंबईसह राज्यभरातील शाळांचा प्रवेशोत्सव होणार आहे. तसंच २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून बहुतांश शाळा हारतुरे, फुगे, फुले यांसारख्या वस्तू घेऊन सजावटीद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यास सज्ज झाल्या आहेत. परंतु यादरम्यान प्रत्येक शाळा 'प्लास्टिकमुक्त' करण्याच्या दृष्टीनं विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

सरकारनं लागू केलेला प्लास्टिकबंदीबाबतचा निर्णय सर्व शाळांमध्ये कटाक्षानं पाळला जाणार असून प्लास्टिकमुक्तीबाबत सर्व मुख्याध्यापकांनी कंबर कसली आहे. त्याशिवाय डब्यासोबतच प्लास्टिकच्या पिशव्या बंद करव्यात, असं आवाहन पालकाना करण्यात येणार आहे.
- प्रशांत रेडिज, मुंबई मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष

मुंबईतील सर्व शाळा शुक्रवार, १५ जूनपासून सुरू होत असल्यानं शाळेचा उंबरठा पहिल्यांदाच ओलांडणाऱ्या मुलांना शाळा हवीहवीशी वाटावी, यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्याच्या सूचना शिक्षण विभागानं दिल्या आहेत.

प्रभातफेरी, विद्यार्थ्यांचं फुलं देऊन स्वागत, मोफत पुस्तक वितरण तसंच मध्यान्ह भोजनातील जेवणात गोड पदार्थांचा समावेश करण्यात येणार आहे. तसंच स्थानिक कलाकार अथवा आजी-माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.


टॅबचं वाटप

इतकंच नव्हे तर पालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी टॅबसह इतर शालोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात येणार आहे. त्यात २७ शालोपयोगी वस्तू, पाठ्यपुस्तकं, तसंच बससेवेसाठी आवश्यक विशेष पास, यांसारख्या वस्तू विद्यार्थ्यांना देण्यात येतील.

काही शाळांमध्ये महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत.


हेही वाचा - 

यंदा महापालिकेच्या ६४९ शाळा होणार द्विभाषिक

शाळांमध्ये दर महिन्याला होणार योगा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा