Advertisement

यंदा महापालिकेच्या ६४९ शाळा होणार द्विभाषिक

महापालिकेच्या शाळेतही विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून मुंबई महापालिकेने महापालिकेच्या काही शाळात इंग्रजी भाषेला प्रथम भाषेचा दर्जा देण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार यंदा महापालिकेच्या ६४९ शाळा द्विभाषिक होणार आहे.

यंदा महापालिकेच्या ६४९ शाळा होणार द्विभाषिक
SHARES

सध्या प्रत्येक आई-वडिलांना आपलं मूल इंग्रजी शाळेत शिकावं, असं वाटत असतं. पण घरची परिस्थिती हलाखाची असल्याने काही पालकांना हा खर्च परवडत नाही. त्यामुळे इच्छा असो वा नसो मुलांना महापालिकेच्या शाळेत टाकलं जातं. त्यामुळे महापालिकेच्या शाळेतही विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून मुंबई महापालिकेने महापालिकेच्या काही शाळात इंग्रजी भाषेला प्रथम भाषेचा दर्जा देण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार यंदा महापालिकेच्या ६४९ शाळा द्विभाषिक होणार आहे.


काय आहेत आदेश?

२०१७ साली मुंबई महापालिकेने दिलेल्या आदेशानुसार, २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांत महापालिकेच्या द्विभाषिक शाळा सुरू करण्यात आल्या. या वर्षांत जवळपास ५८ शाळा द्विभाषिक करण्यात आल्या होत्या. यंदा २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात शिक्षण समितीच्या मंजूरीने महापालिकेच्या ६४९ शाळा द्विभाषिक करण्यात येणार आहे.


द्विभाषिक शाळा म्हणजे काय?

द्विभाषिक शाळा म्हणजे मराठी माध्यमातील सेमी इंग्रजी शाळांत मराठी आणि इंग्रजी या भाषा प्राथमिक भाषा म्हणून शिकवण्यात येतील.


शिक्षण समितीच्या या निर्णयामुळे इंग्रजी भाषेचा ओढा असलेल्या विद्यार्थ्यांचा कल आपोआपच मराठी शाळांकड वाढेल. तसच विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी या दोन्ही विषयाचं ज्ञान प्राप्त होईल. तसंच त्यांना इंग्रजी विषय असणारे सर्व विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन होईल आणि यामुळे आपोआपच इंग्रजी भाषा सुधारायला मदत होईल.
- महेश पालकर, शिक्षणाधिकारीहेही वाचा-

शाळांमध्ये दर महिन्याला होणार योगा

स्कूल व्हॅनवर बंदी घालणं अशक्यच- उच्च न्यायालयसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा