Advertisement

शाळांमध्ये दर महिन्याला होणार योगा


शाळांमध्ये दर महिन्याला होणार योगा
SHARES

संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली अाहे.  महाराष्ट्रातही शाळा, महाविद्यालयात या दिवशी ‘योग दिन’ साजरा केला जातो. पण दर महिन्याच्या २१ तारखेला योगासाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवावा, असं मत शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं. गुरूवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तावडे यांनी राज्यभरातील क्रीडा अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद साधला.


योगामुळं व्यक्तिमत्व  विकसीत 

प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला शाळांमध्ये योग दिवस साजरा करावा आणि किमान अर्धा तास विद्यार्थ्यांना योग शिकवावा.  २१ तारखेला सुट्टी असल्यास त्या तारखेच्या अगोदर किंवा नंतर योग दिवस साजरा करण्यात यावा. योगामुळे विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व विकसीत होते. तसंच  आजच्या धावपळीत आवश्यक असणारी चपळता, एकाग्रता वाढण्यास मदत होते,  हे विद्यार्थ्यांना समजून सांगणं आवश्यक आहे.


जिल्ह्यामध्ये योग महोत्सव

योग दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये योग महोत्सव आयोजित करणं आणि यानिमित्तानं विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेणं आवश्यक असल्याचं तावडे यांनी सांगितलं. यावर्षी २१ जून रोजी योग दिन शाळांमध्ये कशा पध्दतीने साजरा होणार आहे, यासाठी काय नियोजन करण्यात आलं आहे, याबाबतची माहिती १६ जूनपर्यंत शिक्षण आयुक्तांना द्यावी, अशा सूचनाही तावडे यांनी यावेळी केल्या.



हेही वाचा -

स्कूल व्हॅनवर बंदी घालणं अशक्यच- उच्च न्यायालय

आर्किटेक्चर प्रवेशाची मुदत २० जून



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा