Advertisement

स्पर्धा परीक्षांमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी वेगळा प्रवर्ग


स्पर्धा परीक्षांमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी वेगळा प्रवर्ग
SHARES

राज्य शासनाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना जाती-जमातींसाठी राखीव असलेल्या आरक्षणाचा लाभ होत नाही. ही बाब लक्षात घेता अनाथ विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये राखीव जागांचा वेगळा प्रवर्ग ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते मंत्रालय विधीमंडळ आणि वार्ताहर संघाच्या पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.



महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देणाऱ्या एक विद्यार्थिनीने नुकतीच भेट घेऊन याबाबतची समस्या मांडली होती. तिला चांगले गुण असले तरी खुल्या गटातून निवडीसाठी पात्र होण्याइतके गुण नव्हते. त्यामुळे ही समस्या लक्षात घेत अनाथांसाठी वेगळा प्रवर्ग ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल. पुरोगामी महाराष्ट्रासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरु शकेल, असा अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


पुढच्या वेळीही मीच मुख्यमंत्री

राज्यातील लाखोंचा मराठा मोर्चा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा गोंधळ आणि कोरेगाव भीमाच्या प्रकरणानंतर राज्यात मुख्यमंत्री बदलणार अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. मात्र, पुढच्या वेळीही मीच मुख्यमंत्री राहणार, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा