Advertisement

राज्यातील ५४,८२४ शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षणासाठी अर्ज

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे राज्यातील सर्व शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

राज्यातील ५४,८२४ शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षणासाठी अर्ज
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या प्रादुर्भावात वाढ झाल्यानं शिक्षण मंडळानं शाळा व कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्षाच नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा निर्णय घेण्यात आला. जुलै महिन्यापासून अनेक शाळा व कॉलेजनं ऑनलाइन शिक्षणाला सुरूवात केली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनं कसं मार्गदर्शन करावं याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे राज्यातील सर्व शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

राज्यातील शाळा बंद असल्या तरी राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये,यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षण विभागातर्फे गूगल क्लासरूमच्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी ५४ हजाराहून अधिक शिक्षकांनी नोंदणी केली असून त्यात मुंबईतील २३१८ शिक्षकांनी नोंद केली असून, ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक ५ हजार ५७९ आणि पुणे जिल्ह्यातील ४ हजार ३७७ शिक्षकांचा समावेश आहे.

सद्यस्थितीत शाळा महाविद्यालय बंद असली तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थी व शिक्षक यांना प्रत्यक्ष संवाद साधता यावा, शिक्षकांना व विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासावयास देता यावे, शिक्षकांना विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करता यावं, या उद्देशानं राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांना एससीईआरटी तर्फे गूगल क्लासरूम ही सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सुरुवातीला राज्यातील सर्व शासकीय ,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांना गूगल क्लासरूम बाबत ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. पुढील टप्प्यात खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल, असे एससीईआरटी तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ४० हजार शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे एससीईआरटीने परिपत्रकात नमूद केले आहे.परंतु, एकाच  दिवसात ५४ हजाराहून अधिक शिक्षकांनी नोंदणी केली आहे.

अहमदनगर १६३० ,अकोला ७१४,अमरावती १३७३ औरंगाबाद २४८२, भंडारा ३१३, बीड १६८४, बुलढाणा २१४५, चंद्रपूर ६७५,धुळे ९७२, गडचिरोली २३३, गोंदिया ३५७, हिंगोली ६७१, जळगाव २१७७, जालना १०५८, कोल्हापूर १४०३, लातूर २०५६, मुंबई २३१८, नागपूर १५०५, नांदेड ९४६, नंदुरबार १३६१, नाशिक ३३३५, उस्मानाबाद १२७९, पालघर ८९४, परभणी ६०४,पुणे ४ हजार ३८८, रायगड ११२३, रत्नागिरी ६५६, सांगली ८१५, सातारा ४३५९, सिंधुदुर्ग २९५, सोलापूर १६३०, ठाणे ५५७९, वर्धा ३६५,वाशिम ३८३, यवतमाळ ६८३ राज्यभरातील इतक्या शिक्षकांनी नोंद केली आहे.हेही वाचा -

राज्यात कोरोना मृतांचा आकडा १० हजार पार!

ट्रान्स हार्बर मार्गावर २ विशेष लोकलसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा