Advertisement

पालकांना नाडणाऱ्या शाळांवर कारवाई होणार - तावडे


पालकांना नाडणाऱ्या शाळांवर कारवाई होणार - तावडे
SHARES

पालकांना नाडणाऱ्या शाळांवर सरकारकडे असणाऱ्या कायद्याने कारवाई केली जाईल अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी दिली. तसेच जे शासनाला जुमानणार नाहीत त्यांना शाळा चालवता येणार नाहीत. 2 वर्षांत 15 टक्के फी वाढ करता येते. आता 10 टक्के केली असेल तर पुढच्या वर्षी फी वाढ करता येणार नाही, असा दमही त्यांनी शाळा प्रशासनांना दिला आहे. 

शाळांच्या मनमानी कारभाराविरोधात वैतागून काही पालक, विद्यार्थ्यी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भेटले होतो. CBSE, ICSE बोर्डाच्या खासगी  शाळा वारेमाप फी वाढ करत असल्याची तक्रार पालकांनी यावेळी केली. अखेर पालकांच्या तक्रारीची दखल घेत शिक्षण मंत्र्यांनी यावर स्वत: लक्ष घालत शाळांना दम भरला.

संबंधित विषय
Advertisement