Advertisement

अकरावी प्रवेशावेळीच करता येणार जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज


अकरावी प्रवेशावेळीच करता येणार जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज
SHARES

बारावीनंतर इंजिनिअरींग, फार्मसी, एमबीए यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षीपासून जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलं होतं. परंतु प्रवेशावेळी जात वैधता प्रमाणपत्र नसल्यानं विद्यार्थी व पालकांची गैरसोय झाली होती. 

यंदाच्या वर्षी झालेला हा गोंधळ टाळण्यासाठी दहावीनंतर कॉलेजला प्रवेश घेतेवेळी विद्यार्थ्यांकडून जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज घेण्याच्या सुचना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) कडून शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. यानुसार शिक्षण विभागाकडून राज्याच्या जिल्ह्यातील संबंधित सर्व खासगी अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित कनिष्ठ कॉलेजच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत. 


प्रमाणपत्र बंधनकारक विज्ञान शाखेत

राज्य सरकारच्या प्रवेश नियामक प्राधिकरण आणि सीईटी सेल यांनी सप्टेंबर २०१७ ला जाहीर केलेल्या प्रवेशाची नवी नियमावली जाहीर केली होती. या नव्या नियमावलीनुसार, २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेतेवेळी जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार अाहे. अस जाहीर केलं होतं. मात्र अनेक विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र सादर करता न आल्यानं अनेकांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागला होता. 


आॅनलाइन अर्ज 

यंदाच्या वर्षी झालेला हा गोंधळ पुन्हा होऊ नये यासाठी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यातील विद्यार्थ्यांनी दहावी पास झाल्यानंतर अकरावीत प्रवेश घेतेवेळीच जात वैधता प्रमाणपत्रासाठीचा अर्ज आॅनलाइन भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. हा अर्ज केल्यास त्यांना बारावी उत्तीर्ण होण्याआधीच जातवैधता प्रमाणपत्र मिळेल व त्यांना प्रवेशावेळी कोणतीही गैरसोय होणार नाही. 


प्राचार्यांना निर्देश

त्याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत मात्र त्यांच्याकडे अद्याप प्रमाणपत्र नाही अशा विद्यार्थ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याची नोटीस कॉलेजांनी जाहीर करावी व या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव समितीला पाठवण्यात यावे असे निर्देशही मुखाध्यापक/ प्राचार्यांना देण्यात आले आहेत.हेही वाचा - 

सिनेट सदस्यांच्या मागण्यांकडे कुलगुरूंचा कानाडोळा- युवासेना

१४ ते १६ डिसेंबर दरम्यान रंगणार आयआयटीचा टेकफेस्ट


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा