Advertisement

१४ ते १६ डिसेंबर दरम्यान रंगणार आयआयटीचा टेकफेस्ट

दरवर्षीप्रमाणेही आयआयटीमध्येही टेकफेस्ट आयोजित करण्यात आला असून 'टाईमलेस लॅप्स' यावर्षीही थीम असणार आहे. जिथे वेळ मंदावते, काहीशी मागे जाते, मग भरधाव पुढे जाते आणि अचानक थांबते' अशा वेळेच्या चक्राभोवती यंदाचा टेकफेस्ट रंगणार आहे.

१४ ते १६ डिसेंबर दरम्यान रंगणार आयआयटीचा टेकफेस्ट
SHARES

विविध संशोधनासाठी नामांकित असलेल्या मुंबईच्या आयआयटीचा टेकफेस्ट यंदा १४ ते १६ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे.  हा टेकफेस्ट केवळ मनोरंजन आणि स्पर्धांसाठीच मर्यादित राहणार नसून येणाऱ्या पिढीला उद्याचे संशोधक म्हणून घडवण्यासाठी हा टेकफेस्ट आयोजित करण्यात येणार आह


टाईमलेस लॅप्स

दरवर्षीप्रमाणेही आयआयटीमध्येही टेकफेस्ट आयोजित करण्यात आला असून 'टाईमलेस लॅप्स' यावर्षीही थीम असणार आहे. जिथे वेळ मंदावते, काहीशी मागे जाते, मग भरधाव पुढे जाते आणि अचानक थांबते' अशा वेळेच्या चक्राभोवती यंदाचा टेकफेस्ट रंगणार आहे. विशेष म्हणजे या टेकफेस्टमध्ये २० पेक्षा जास्त कार्यशाळा घेण्यात येणार असून त्या जगभरातील विद्यार्थ्यांना लाईव्ह पाहता येणार आहेत. या कार्यशाळेसाठी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील जगभरात नावाजलेले ब्रॅंड्स सहभागी होणार आहेत. 


परदेशी टिम्स सहभागी 

या कार्यशाळांमध्ये 'झिरो एनर्जी बिल्डिंग', 'बिल्डिंग चॅट बॉट', 'नॅनो मशीन टेक्नॉलॉजी', 'एथिकल हॅकिंग', 'सोलरायझर', 'अंडरवॉटर रोबोटिक्स', 'अल्ट्रासॉनिक टेस्टिंग', 'ओपन डेटा सायन्स' अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्याशिवाय टेकफेस्टच्या सोहळ्यामध्ये यंदा अनेक परदेशी टिम्स सहभागी होणार आहेत. त्याशिवाय तंत्रज्ञानविषयक प्रदर्शनात 'तुम्हाला काय दिसतंय, याऐवजी तुम्ही काय पाहताय त्यावर विश्वास ठेवून पाहा' या वाक्यानंच टेक्नोवेड्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. 


रशियाची सफर

त्याशिवाय यंदाच्या या टेकफेस्टमध्ये शालेय विद्यार्थ्यांना रशियाची सफरही घडवली जाणार आहे. ‘टेकफेस्ट’च्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना रशियाची सफर घडवली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना टेकफेस्टमधील ‘इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धा जिंकावी लागणार आहे.


अशी करा नोंदणी 

या कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना 'टेकफेस्ट' च्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करावी लागणार आहे. 'आयओटी' व 'क्वाडकॉप्टर आरसी ड्रोन' या कार्यशाळांची नोंदणीची तारीख संपली असून इतर कार्यशाळांसाठी अद्याप नोंदणी सुरू आहे.हेही वाचा - 

पाटकर, खालसा काॅलेजांना स्वायत्तता

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रासाठी पालिकेकडून २० कोटींचा निधी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा