Advertisement

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रासाठी पालिकेकडून २० कोटींचा निधी

ठाणे महानगरपालिका उभारत असलेल्या नवीन स्टार्ट-अप केंद्रामध्ये मुंबई विद्यापीठाला ३० हजार स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करुन दिली जाणार असून ज्यामध्ये इन्क्युबेशन, एक्सलेरेशन आणि स्टार्टअपच्या उपक्रमांना अधिक गती मिळणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रासाठी पालिकेकडून २० कोटींचा निधी
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राचं लवकरच विस्तारीकरण करण्यात येणार असून यासाठी ठाणे महानगर पालिकेने २० कोटीचा निधी मंजूर केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राच्या विस्तारीकरणाबाबतचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी मांडण्यात आला होता. या योजनेत पायाभूत सुविधा, नवीन वसतिगृह आणि नवीन अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. 


विशेष बैठक

ठाणे महानगरपालिका उभारत असलेल्या नवीन स्टार्ट-अप केंद्रामध्ये मुंबई विद्यापीठाला ३० हजार स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करुन दिली जाणार असून ज्यामध्ये इन्क्युबेशन, एक्सलेरेशन आणि स्टार्टअपच्या उपक्रमांना अधिक गती मिळणार आहे. गुरुवारी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी एका विशेष बैठकीचं आयोजन केलं होतं. 


मालमत्ता करात सवलत

या बैठकीत ठाणे परीक्षेत्राला लावण्यात येणारा मालमत्ता कर हा व्यावसायिक संकुलाच्या दराप्रमाणे लावण्यात येणार नसून हा दर शिक्षण संकुलाच्या दराप्रमाणे लावण्यात येणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आले. त्याशिवाय पाणी शुल्कातही मोठी सवलत दिली जाणार असून पालिकेच्या मदतीतून ठाणे उपकेंद्रात मेगा प्लांटेशन करण्यात येणार आहे. त्याशिवाय या उपकेंद्रात दिशादर्शक फलकही लावण्यात येणार असून पालिकेची विशेष बस सुविधा थेट उपकेंद्रापर्यंत देण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे नागरिकांच्या सुविधेसाठी आणि  माहितीसाठी ठाणे महानगर पालिकेच्या संकेतस्थळावर ठाणे उपकेंद्रासाठी स्वतंत्र लिंक ही लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


मान्यवर उपस्थित

या बैठकीला आमदार निरंजन डावखरे, व्यवस्थापन परिषद सदस्य दिपक मुकादम, प्राचार्य डॉ. नरेशचंद्र, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय भामरे, अधिसभा सदस्य महादेव जगताप, शशिकांत झोरे, ठाणे उपकेंद्रांचे संचालक डॉ. चंद्रशेखर मराठे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.  


सध्या मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात एक इमारत असून, त्यात बीएमएस-एमबीए आणि बीबीए-एलएलबी हे दोन पाच वर्षीय अभ्यासक्रम शिकवले जातात. ठाणे पालिकेने मंजूर केलेल्या २० कोटी रुपयांच्या निधीतून ठाणे उपकेंद्राच्या विस्तारीकरणाला मोठी मदत होणार असून अाहे. या ठिकाणी वसतिगृहासह विविध पायाभूत सुविधांबरोबरच नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार अाहेत. 

 - डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरु, मुंबई विद्यापीठ



हेही वाचा - 

सिद्धार्थ कॉलेजच्या खेळ महोत्सवासाठी मैदान देण्यास विद्यापीठाचा नकार

आयडॉलच्या मान्यतेची प्रक्रिया अद्याप सुरू, विद्यापीठाचा खुलासा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा