Advertisement

जेबीआयएमएसच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी भरघोस पॅकेज

बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेतील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत कामाचा अनुभव यावा या उद्देशाने दरवर्षी विविध कंपन्यांमध्ये विदयार्थ्यांना प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात येतं. यंदा विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी विविध क्षेत्रातील ५२ कंपन्या प्लेसमेंट प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या.

जेबीआयएमएसच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी भरघोस पॅकेज
SHARES

जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या (जेबीआयएमएस) विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. २०२० या शैक्षणिक वर्षामध्ये पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टीत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. यंदा दोन महिन्यांसाठी भरघोस पॅकेज देऊन विद्यार्थ्यांची निवड केली आहे. 


५२ कंपन्या सहभागी

बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेतील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत कामाचा अनुभव यावा या उद्देशाने दरवर्षी विविध कंपन्यांमध्ये विदयार्थ्यांना प्रशिक्षणासाठी नियुक्त  करण्यात येतं. यंदा विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी विविध क्षेत्रातील ५२ कंपन्या प्लेसमेंट प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. यात सर्व विद्यार्थ्यांची नियुक्ती झाली आहे. या बॅचमधील १० टक्के विद्यार्थ्यांना १ लाख २४ हजार रुपये तर ३० टक्के विद्यार्थ्यांना १ लाख ८० हजार रुपयांचं पॅकेज देण्यात आलं आहे. 


बँकिंगमध्ये सर्वाधिक निवड

इन्व्हेटमेंट बँकिंग, इक्विटी बँकिंग, कॉर्पोरेट बँकिंग, कमर्शिअल बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांनी सर्वाधिक ३० टक्के विद्यार्थ्यांची निवड केली असून सल्लागार क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांनी १६ टक्के विद्यार्थ्यांची निवड केली आहे. याचबरोबर औषधनिर्माण क्षेत्रातील कंपन्या, तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनीही विद्यार्थ्यांची या प्रशिक्षण कालावधीसाठी निवड केल्याचं संस्थेने दिलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.


जेबीआयएमएसमध्ये दिले जाणारे शिक्षण हे व्यवसायाभिमुख व कार्यानुभवावर आधारित असते. यामुळे बहुतांश कंपन्या येथील विद्यार्थ्यांना नियुक्त करण्यासाठी पसंती देतात. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या बॅचनेही नवीन इतिहास रचला असून या माध्यमातून आम्हाला विविध कंपन्यांकडून संस्थेतील शिक्षणाविषयी पावती मिळते 

- डॉ. कविता लघाटे, संचालक, जेबीआयएमएस



हेही वाचा-

'मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची न्यायालयीन चौकशी करा'

आॅनलाइन तक्रार नोंदवायची कुठे? इंजिनीअरिंग काॅलेजांचा नियमाला हरताळ




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा