Advertisement

ऑनलाइन पेट परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


ऑनलाइन पेट परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
SHARES

मुंबई विद्यापीठातर्फे प्रथमच ऑनलाईन घेण्यात येणाऱ्या पीएचडी प्रवेश परीक्षेला (पेट) विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या परीक्षेसाठी ६ हजार १६८ विद्यार्थ्यांनी यशस्वी नोंदणी केली असून या परीक्षेसाठी मुंबई विद्यापीठांतर्गत ४ हजार ६२८ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्याशिवाय उर्वरित इतर शहरातूनही विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या पेट परीक्षेला पसंती दिली आहे.


इतक्या विद्यार्थ्यांची नोंदणी

आतापर्यंत पेट परीक्षेला पुण्यातून ३२९, नाशिक २११, अहमदनगरमधून १०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून इतर शहरातूनही विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त परराज्यात दिल्लीतून १८ आणि गोव्यतून एकूण १७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

सर्वाधिक गुजरात राज्यातून ३० विद्यार्थ्यांनी यशस्वी नोंदणी केली आहे. तसंच या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या १२ विद्यार्थ्यांनी त्यांची पदव्युत्तर पदवी परदेशी विद्यापीठातून केली आहे. गेल्यावर्षी २०१७ ला ३ हजार ७०० विद्यार्थ्यांनी तर २०१६ साली ३ हजार ३५० विद्यार्थ्यांनी यशस्वी नोंदणी केली होती. मागील दोन वर्षांचा विचार करता यावर्षीची नोंदणी ही सर्वाधिक आहे.


एवढे अर्ज आले

विद्याशाखा निहाय नोंदणीमध्ये वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेतून एकूण ९९६ एवढे अर्ज आले असून मानव्यविद्या शाखेतून १ हजार ५६८ एवढे अर्ज आले आहेत. तर सर्वाधिक विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतून ३२९६ एवढे अर्ज विद्यापीठाकडे प्राप्त झाले आहेत.

पीएचडी प्रवेश परीक्षा रविवार २३ डिसेंबर, २०१८ रोजी विविध ५० केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी प्रवेश पत्र (हॉल तिकीट) १५ डिसेंबर २०१८ पासून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येईल,
- डॉ. अर्जुन घाटुळे, संचालक, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २०१६ च्या नवीन निर्देशानुसार विद्यापीठाने नुकतीच पीएचडी आणि एमफीलच्या प्रवेशाच्या संदर्भात कुलगुरूंचे निर्देश (Vice Chancellor Directeves) प्रसिद्ध केलं होतं. या आधारावर २०१८ ची पीएचडी आणि एमफील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ४ विद्याशाखामधून ७८ विषयांमध्ये घेतली जाणार असून ही परीक्षा ऑनलाईन असून संशोधन पद्धती आणि विद्यार्थ्याचा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विषयावर आधारित असणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा