होतकरू विद्यार्थीनीला मदत

 vile parle
होतकरू विद्यार्थीनीला मदत

विले पार्ले- विले पार्ले पूर्व येथील विद्यार्थीनी दक्षता वळंजू या मुलीला दहावीच्या शैक्षणिक वर्षासाठी 15 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. युवासेना विले पार्ले विधानसभेच्या शाखा क्रमांक-८० आणि पार्ले क्रिकेट कपच्या वतीने विभाग अधिकारी डॉ सतीश नारसिंग यांच्याकडून ही मदत देण्यात आली आहे. वरुण सरदेसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन त्यांच्या हस्ते १५ हजार रोख रक्कम, वहया आणि दप्तर देण्यात आले. या कार्यक्रमाला युवा विधानसभा चिटणीस विश्वास पाटेकर, शाखा क्र-७९ चे शाखाअधिकारी , शाखा क्र-८० उपशाखा अधिकारी आणि पार्ले क्रिकेट कपचे आयोजक उपस्थित होते.

Loading Comments