Advertisement

स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचा समारोप


स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचा समारोप
SHARES

लालबाग - लालबाग येथील गरमखाडा मैदानात स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. २९ नोव्हेंबरला या व्याख्यानमालेला सुरूवात झाली. या व्याख्यानमालेची सांगता शनिवारी झाली. गेल्या ५९ वर्षांपासून विद्यार्थी उत्कर्ष मंडळातर्फे या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येत आहे. लोकांपर्यंत नेहमी चांगले संदेश आणि चांगल्या गोष्टी पोहचाव्या या उद्देशानं दादा गावकर यांनी या व्याख्यानमालेची सुरुवात केली होती. या पाच दिवसांत विविध विषयाचे वक्ते वेगवेगळ्या विषयावर भाष्य करून लोकांना एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतात. शनिवारी या व्याख्यानमालेत सामाजिक कार्यकर्ती आणि पुण्यातील एकलव्य न्यास संस्थेची संस्थापिका रेणू गावस्कर यांनी पालकत्व ही जबाबदारी कशी सांभाळावी या विषयी व्याख्यान केलं. पालकत्व या विषयावर बोलत असताना पालघरच्या पाळणा घरात झालेल्या प्रकारावरही त्यांनी भाष्य केलं. इतकं लहानसं बाळ पाळणा घरात सोडावं का? असे अनेक प्रश्न त्यांनी या निमित्तानं मांडले. या व्याख्यानमालेला शेकडो लोक उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा