Advertisement

उदयोन्मुख संशोधकांसाठी रविवारी 'फ्रंटीअर्स आॅफ सायन्स' परिषदेचं आयोजन


उदयोन्मुख संशोधकांसाठी रविवारी 'फ्रंटीअर्स आॅफ सायन्स' परिषदेचं आयोजन
SHARES

टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) संस्थेने ९ वी, १० वी चे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी 'फ्रंटीअर्स आॅफ सायन्स' या वार्षिक विज्ञान परिषदेचं आयोजन केलं आहे. रविवार २६ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान कुलाब्यातील होमी भाभा आॅडिटोरीअम इथे ही परिषद भरणार आहे.


कोण उपस्थित राहणार?

या परिषदेत मुंबई परिसरातील १०० हून अधिक शाळांतील १,७०० विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत विज्ञानावर आधारीत प्रात्याक्षिक, चर्चा आणि मार्गदर्शनाचा समावेश असेल.


संशोधन कार्य अनुभवण्याची संधी

या मेळाव्याद्वारे विद्यार्थी आणि शिक्षकांना विज्ञान तसेच संशोधनावर आधारीत अविष्कार पाहायला मिळतील. एवढंच नव्हे, तर या मेळाव्यातून भारतातील ४० हून अधिक नामवंत प्रयोगशाळा 'याची देही, याची डोळा' पाहण्याची, त्यातील संशोधन कार्य अनुभवण्याची संधीही त्यांना मिळणार आहे.

या परिषदेतून अॅस्ट्रोनाॅमी ते झूलाॅजी अशा विज्ञानातील विस्तृत श्रेणी आणि 'टीआयएफआर'मध्ये सुरू असलेल्या गणित संशोधनाचा वास्तवदर्शी अनुभव आमच्या व्हिजीटर्सना घेता येईल. 'टीआयएफआर'चे एम.एससी आणि पीएचडीचे विद्यार्थी व्हिजीटर्ससोबत बॅटलींग मायक्रोब्स या विषयावर चर्चा करतील. ताऱ्यांपासून एक्सरेप्रणाली अशा सर्व विषयांचा त्यात समावेश असेल, अशी माहिती आऊटरिच टीमचे अध्यक्ष अर्नब भट्टाचार्य यांनी दिली.

टीप: हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच असल्याने अगोदर नोंदणी झालेली नसेल, तर थेट 'टीआयएफआर' येथे येऊ नका. हा कार्यक्रम तुम्हाला फेसबुकवर लाइव्ह बघायला मिळेल. अधिक माहितीसाठी arnab.tifr@gmail.com येथे संपर्क साधू शकता.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement