रॅलीमधून शांततेचा संदेश


  • रॅलीमधून शांततेचा संदेश
SHARE

जीटीबी नगर - जीटीबी नगर येथील गुरुनानक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोमवारी रॅली काढून शांततेचा संदेश दिला. सोमवारी सकाळी गुरुनानक महाविद्यालयापासून गुरु तेग बहादूर नगर रेल्वे स्थानकापर्यंत ही रॅली काढण्यात आली. यावेळी उरी येथे झालेल्या भ्याड दहशदवादी हल्याचा निषेध करून 'दहशदवाद संपवा', 'teach peace' असे संदेश विद्यार्थ्यांनी दिले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी एक पथनाट्य सादर केले. लोकांमध्ये देशाबद्दल प्रेम व दहशदवादाचा नायनाट करून एकता कायम ठेवण्याचा संदेश या विद्यार्थांनी दिला. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य विजय दाभोलकर यांनी मार्गदर्शन केले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या