Advertisement

'यांच्या' स्मरणार्थ साजरा करतात टीचर्स डे


'यांच्या' स्मरणार्थ साजरा करतात टीचर्स डे
SHARES

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु : गुरुर्देवो महेश्वर:
गुरुस्साक्षात् परम् ब्रह्म श्रीगुरवे नम:

आईनंतर दुसरे महत्त्वाचे स्थान असते ते गुरूचे. आपल्या आयुष्याला दिशा देण्याचे काम गुरु करतो. त्यामुळे आपल्याकडे शिक्षक दिनाला खूप महत्त्व आहे. या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. शाळांमध्ये तर या दिवशी खास सेलिब्रेशन असते. यादिवशी विद्यार्थी शिक्षक होतात आणि प्रत्येक वर्गात शिकवतातही.

5 सप्टेंबरला शिक्षक दिन का साजरा करतात?

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षणक्षेत्रात त्यांनी फार मोठे योगदान दिले. राधाकृष्णन यांच्या कार्याचा गौरव आणि आपल्या आयुष्यातील शिक्षकांचे स्थान लक्षात राहावे यासाठी डॉ. राधाकृष्णन यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

कोण होते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण?

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 साली आंध्रप्रदेशातल्या तिरुत्तणी या छोट्या खेड्यात झाला. गावात कसल्याच सोई-सुविधा नाहीत. शाळेत विषय शिकवण्यासाठीही फक्त एकच शिक्षक. अशा शाळेत राधाकृष्णन यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. राधाकृष्णन लहानपणापासूनच हुशार आणि बुद्धीने तल्लख होते. डॉ. राधाकृष्णन यांनी तत्वज्ञान विषयातूनच बी.ए आणि एम.ए केले. एम.ए मध्ये आपल्या आवडत्या विषयाचा प्रथम वर्ग मिळवणाऱ्या अवघ्या 21 वर्षांच्या राधाकृष्णन यांना नोकरी शोधण्यासाठी फारसे कष्ट करावे लागले नाहीत. मद्रास इथल्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयानं त्यांना तत्वज्ञान हा विषय शिकवण्यासाठी पाचारण केले. 1909 ते 1916 अशी आठ वर्षे याच महाविद्यालयात त्यांनी सेवा बजावली. भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे राधाकृष्णन यांनी भूषवले. 1931 ते 1939 ही वर्षे त्यांनी राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व केले. 1949 ते 1952 मध्ये रशियातील राजदूत म्हणून त्यांची भारत सरकारने नियुक्ती केली होती. 1952 मध्ये ते भारतात परतले. 1952 ते 1962 या कालावधीत त्यांनी देशाचे उपराष्ट्रपतीपद भूषविले. 1954 मध्ये भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब बहाल केला. राधाकृष्णन यांनी अनेक ग्रंथ देखील लिहली आहेत. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा