Advertisement

शिक्षकांचे पगार पुन्हा रखडणार, 'शालार्थ' यंत्रणा बंदच

राज्यातील माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारांसाठी 'शालार्थ' ही ऑनलाइन प्रणाली वापरली जाते. मात्र गेल्या १० ते १२ दिवसांपासून ही आॅनलाईन यंत्रणा बंद असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुढील महिन्याची शिक्षकांची बिलं आणि पगार काढायचे कसे? असा प्रश्न शाळा व्यवस्थापनाला पडला आहे.

शिक्षकांचे पगार पुन्हा रखडणार, 'शालार्थ' यंत्रणा बंदच
SHARES

नव्या वर्षांत शिक्षकांचे पगार पुन्हा रखडणार आहेत. कारण शिक्षकांच्या पगारासाठी असणाऱ्या 'शालार्थ' आॅनलाईन प्रणालीत पुन्हा तांत्रिक अडचणी आल्या आहेत. राज्यातील माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारांसाठी 'शालार्थ' ही ऑनलाइन प्रणाली वापरली जाते. मात्र गेल्या १० ते १२ दिवसांपासून ही आॅनलाईन यंत्रणा बंद असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुढील महिन्याची शिक्षकांची बिलं आणि पगार काढायचे कसे? असा प्रश्न शाळा व्यवस्थापनाला पडला आहे. त्यामुळे ही यंत्रणा बंद असल्याने पुढील महिन्याच्या १ तारखेला अनुदानित शाळांतील शिक्षकांचे पगार होणार नाहीत हे निश्चित झालं आहे.


आश्वासन अपूर्णच

यंदा वर्षाच्या सुरुवातीपासूनच या प्रणालीच्या वापरात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याची ओरड शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांकडून करण्यात येत होती. त्यामुळेच राज्यातील अनेक शिक्षकांचे पगार वेळच्या वेळी होण्यातही अडचणी येत होत्या. मात्र तांत्रिक अडचणी दूर करून लवकरच यंत्रणा सुरु केली जाईल आणि शिक्षकांचे पगार वेळेवर होतील अशी ग्वाही शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. तरीही मात्र 'शालार्थ'च्या अडचणी सुरूच असून आतातर मागच्या १० ते १२ दिवसांपासून ही अाॅनलाईन यंत्रणाच बंद असल्याची माहिती मिळाली आहे.


शिक्षण संचालकाकडून आवाहन

'शालार्थ'च्या सर्व्हरची समस्या अजून सुटलेली नसून ती समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती पुण्याच्या शिक्षण संचालक कार्यलयाकडून मिळाली आहे. तांत्रिक अडचण दूर होऊन 'शालार्थ' लवकरात लवकर सुरु केली जाईल. राज्याच्या जिल्ह्यातील संबंधितांना ही माहिती द्यावी, असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं आहे.


पगार आॅफलाईन द्या

'शालार्थ'मध्ये तांत्रिक अडचणी कायमचाच झाल्या आहेत. मात्र आता यावेळी १०-१२ दिवस झाले तरी बिघाड कायम आहे. त्यामुळे सरकारने शिक्षकांच्या पगारासाठी ही सुविधा ऑफलाईन करावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघटनाकडून करण्यात येत आहे.



हेही वाचा-

समायोजन झालं, वेतनाचं काय? शिक्षकांचा सवाल


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा