Advertisement

शिक्षकांचं धरणे आंदोलन


शिक्षकांचं धरणे आंदोलन
SHARES

आझाद मैदान - राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमाकांत पांडेंविरोधात शिक्षकांनी मंगळवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केलं. 'राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमाकांत पांडे यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्काराचा गैरवापर केला आहे, त्यांनी 200 पेक्षा अधिक चौकशी समित्यांवर पुरस्कारीत सदस्य म्हणून काम करून शेकडो शिक्षक शिक्षकेतर आयुष्य उद्ध्वस्त केलेत', असा आरोप शिक्षक शिक्षकेतर स्थानिक लोकाधिकार समिती आणि शिक्षक लोकशाही आघाडीने केलाय. तसंच उच्च न्यायालयानंही रिट याचिकेत पांडेंविरोधात जाणीवपूर्वक बेकायदेशीर कृत्य केल्याबाबत कठोर कारवाई करण्याची टिपण्णी केली आहे. त्यामुळे या शिक्षकांनी पांडेंविरोधात कठोर कारवाई व्हावी म्हणून मंगळवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केल्याचं शिक्षकेतर लोकाधिकार समितीचे सरचिटणीस दिलीप देशमुख यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा