Advertisement

हजारो शिक्षकांना वेतनवाढीचा दिलासा


हजारो शिक्षकांना वेतनवाढीचा दिलासा
SHARES

मुंबईतील शेकडो शिक्षक व शिक्षकेतरांची सेवा १२ वर्षे होऊनही वरिष्ठ वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण न झाल्याचे कारण देऊन अनेकांना नाकारल जात होते. शिक्षण विभागातर्फे प्रशिक्षणाचं आयोजन न केल्याने प्रशिक्षण पूर्ण करणे शक्य नसल्यान हजारो शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळत नव्हता. मात्र आता हमीपत्राच्या आधारावर ही वेतनवाढ दिली जाणार असल्यान हजारो शिक्षकांना वेतनवाढीचा दिलासा मिळणार आहे.


शिक्षक भारतीची मागणी

सेवेची १२ व २४ वर्षे पूर्ण झाल्यावर वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी दिली जाते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये तांत्रिक कारणं पुढे करत ही वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी दिली जात नव्हती. यामुळे शिक्षक भारतीने ज्या शिक्षकांची सेवा १२ वर्षे पूर्ण झाली आहे, त्यांना भविष्यात प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या हमीपत्रावर वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याची मागणी केली होती.


वेतनश्रेणीचा लाभ मिळणार

लेखाधिकाऱ्यांनी हमीपत्रावर वेतनश्रेणीचा लाभ देण्याबाबत असमर्थता दर्शवली होती. आमदार कपिल पाटील यांनी हमीपत्रावर वेतनश्रेणीचा लाभ देण्याबाबत पाठपुरावा केला. त्यामुळे २३ ऑक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयापूर्वी ज्या शिक्षकांच्या सेवेची १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना हमीपत्र देऊन वेतनश्रेणीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची आवश्यकता नसल्यान वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्याबाबतची परवानगी लेखाधिकारी कार्यालयाने दिली आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा