Advertisement

विदयार्थ्यांचे भवितव्य टांगणीला


विदयार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
SHARES

कांदिवली- पश्चिमेकडील भाब्रेकरनगर येथील श्रीमती सरोजादेवी आदर्श विद्यालय हिंदी माध्यमिक शाळा एसआरएच्या अपात्र पात्रतेच्या कक्षेत अडकली आहे. त्यामुळे येथे शिकत असलेल्या 1 ते 10 वीच्या 1 हजार विदयार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. संत श्री रामकुमार शम्भूराम चौरासिया एज्युकेशन ट्रस्ट संचालित 5 ते 10 वीपर्यंत शाळा अनुदानित असून 25 शिक्षक आणि 5 शिक्षकेतर कर्मचारी असा एकूण 30 जण शाळेत कार्यरत आहेत. शाळेला 25 वर्ष पूर्ण झाली असून 2000 साली शाळेला मान्यता मिळाली.
शाळा असलेली जागा ही झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्पाअंतर्गत येते. तेथे खासगी बिल्डराकडून एसआरए प्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. तर बिल्डराने शाळा असलेली जागा अपात्र ठरवली असल्याचा आरोप शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम चौरसिया यांनी केला आहे. तसंच उच्च न्यायालायनेही बिल्डराच्या बाजूने निर्णय देऊन शाळा खाली करायचा आदेश दिला असल्याचं त्यांनी सांगितले. मात्र विद्यार्थी दुसऱ्या शाळेत जाण्यास तयार नसल्यामुळे येथेच वर्ग भरवले जातात. अनेकदा बिल्डरने शाळेच्या खोलींवर तोडक कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र विदयार्थी आणि पालकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. मात्र दिवाळीच्या सुट्टीतील संधी साधून जिल्हाधिकारी आणि पोलीस बंदोबस्तात बिल्डराकडून शाळेच्या खोलींवर तोडक कारवाई करण्यात आली. त्यामुळे सध्या शाळेचे वर्ग शाळेच्या आवारातील मंदिरातील मोकळ्या जागेत भरत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा