Advertisement

CBSE १२वी बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवरील सुनावणी ३ जूनपर्यंत टळली

सर्वोच्च न्यायालयात सोमवार ३१ मेला पुन्हा एका सीबीएसई (CBSE) आणि सीआयएससीई (CISCE) द्वारे आयोजित १२वी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. परंतु सोमवारी पुन्हा एकदा याचिकेवरील सुनावणी स्थगित करण्यात आली आहे.

CBSE १२वी बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवरील सुनावणी ३ जूनपर्यंत टळली
SHARES

सर्वोच्च न्यायालयात सोमवार ३१ मेला पुन्हा एका सीबीएसई (CBSE) आणि सीआयएससीई (CISCE) द्वारे आयोजित १२वी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. परंतु सोमवारी पुन्हा एकदा याचिकेवरील सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं यावर उत्तर देण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली आहे. याबाबत सरकार येत्या काही दिवसात १२वी बोर्ड परीक्षेबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं केंद्र सरकारनं कोर्टात स्पष्ट केलं.

CBSE १२वी बोर्ड परीक्षा रद्द करण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणी सध्या ३ जूनपर्यंत टळली आहे. 'गुरुवार पर्यंतची मुदत द्यावी. सरकार अंतिम निर्णय तेव्हाच कळेल', असं केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाला सांगितलं. 'जो काही निर्णय घ्यायचा असेल तो घ्या.', असं सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं सांगितलं. तसंच, 'मागील वर्षात अवलंबलेलं धोरण यंदाही अवलंबता येऊ शकतं.', असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं. शिवाय, 'जर सरकार मागील वर्षाच्या आपल्या निर्णयापासून मागे हटत असेल तर त्यांनी ठोस कारण सांगावं', असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. सरकारच्या निर्णयानंतर आम्ही याचा तपास करु, असंही सुप्रीम कोर्टाने नमूद केलं.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परंतु, १२वी बोर्डाची परीक्षा केवळ स्थगित करण्यात आल्या आहेत. मात्र बारावीची परीक्षा देखील रद्द करावी आणि याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी होत आहे. त्यातच सुप्रीम कोर्टात बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे.

ज्यावर मागील आठवड्यात शुक्रवारी सुनावणी होणार होती, परंतु ती टळली. सोमवारी या याचिकेवर पुन्हा एकदा सुनावणी झाली, जी पुन्हा एकदा टळली आहे. आता या याचिकेवरील पुढील सुनावणी ३ जून रोजी होणार आहे. सीबीएसईची १२वी बोर्डाच्या परीक्षेबाबत सरकारला १ जूनपर्यंत निर्णय घ्यायचा होता. पण आता अंतिम निर्णय घेण्यात उशीर होणार आहे. परीक्षेबाबत आतापर्यंत दोन वेळा बैठक झाली आहे. परीक्षा कधी आणि कशी होणार यावर चर्चा सुरु आहे. या दरम्यानच परीक्षा रद्द करण्याची मागणी होत आहे.



हेही वाचा -

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा