मुंबई - बारावीच्या पेपरफुटी प्रकरणात दोन मुलांना अटक करण्यात आली आहे. तर एका संशयित विद्यार्थ्याला परीक्षा दिल्यानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. परीक्षेत मोबाईल ठेवण्यास बंदी असूनही कशा प्रकारे पेपर व्हॉटसअप केले जातात याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पेपर फुटला असे म्हणता येणार नाही. कारण परीक्षा सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे आधी पेपर व्हॉट्सअपवर फिरत होता असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्राचा चुकीचा वापर करू नये, असे आवाहनही विनोद तावडे यांनी केले आहे.