मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर

  Pali Hill
  मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर
  मुंबई  -  

  कलिना- विद्यापीठाने TYBSC आणि MSC सह अनेक परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. याबाबत परीक्षा नियंत्रकानी विद्यापीठाच्या वेबसाइटवर परिपत्रक जारी केले आहे. विद्यापीठाचे प्रवेश रखडल्यामुळेच विद्यापीठाला या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.

  नव्या वेळापत्रकानुसार TYBSC कॉम्प्युटर सायन्सच्या डाटा कम्युनिकेशनची १० ऑक्टोबरला होणारी परीक्षा आता २६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तसेच मॅथेमेटिक्सची १० ऑक्टोबरला होणारी परीक्षा आता २६ ऑक्टोबरला होणार आहे. याशिवाय १३ ऑक्टोबरला होणारी कॉॅम्प्युटर सायन्स ऍडव्हान्सची परीक्षा २७ ऑक्टोबरला होणार आहे. याबरोबर इतर अनेक पुढे ढकललेल्या परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाने वेबसाइटवर जाहीर केले आहे. संबंधित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी या बदललेल्या वेळापत्रकाची दखल घ्यावी असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा नियत्रंकानी केले आहे.

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.