Advertisement

यूजीसी ठेवणार विद्यार्थ्यांच्या करिअरचीही माहिती

देशातील विविध विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिअरवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

यूजीसी ठेवणार विद्यार्थ्यांच्या करिअरचीही माहिती
SHARES

देशातील विविध विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिअरवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं (यूजीसी) 'विद्यार्थी करिअर आणि माजी विद्यार्थी' योजना हाती घेतली आहे. यूजीसीकडून शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ व सर्वसामान्यांकडून सूचना मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सूचना २२ नोव्हेंबरपर्यंत studentprogression.alumni@gmail.com या मेल आयडीवर पाठवण्याचे आवाहन यूजीसीकडून करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांची माहिती

'विद्यार्थी करिअर आणि माजी विद्यार्थी' या योजनेंतर्गत देशातील विद्यापीठ व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची माहिती एकत्र करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. यूजीसीनं शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ व सर्वसामान्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत सूचना मागवल्या आहेत. देशातील केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ, डीम्ड युनिव्हर्सिटी, खासगी विद्यापीठ असे तब्बल ९०७ विद्यापीठ यूजीसीशी संलग्न आहेत.

विद्यार्थ्यांच्या करिअरची माहिती

देशातील या विद्यापीठांशी ४० हजार महाविद्यालये संलग्न आहेत. यामध्ये दरवर्षी ३ कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यातील १ कोटी विद्यार्थी दरवर्षी पदवी घेतात. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे महाविद्यालयांत प्रवेश घेत असतात. त्यामुळं विद्यापीठातील शैक्षणिक विभागांशी त्यांचा संबंध येत नाही. त्यामुळं महाविद्यालये व विद्यापीठामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिअरची माहिती जमा करण्याचा निर्णय यूजीसीनं घेतला आहे.



हेही वाचा -

मुंबईच्या महापौरपदी यशवंत जाधव?

मध्य रेल्वेच्या 'या' एक्स्प्रेस होणार ‘उत्कृष्ट’



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा