• विद्यापीठाचं ग्रंथालय राहणार रात्री पावणेदहा वाजेपर्यंत खुलं
SHARE

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील राजाबाई टॉवर येथे असलेल्या ग्रंथालयाच्या वेळेत बदल करण्याची मागणी विद्यार्थ्यांमार्फत करण्यात येत होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मुंबई विद्यापीठातील ग्रंथालय आता रात्री पावणेदहा वाजेपर्यंत सुरू राहणारं असून यामुळं लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. त्याशिवाय दुसरा व चौथा शनिवार, रविवारी व इतर सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही विद्यापीठाचं ग्रंथालय सुरू राहणार आहे. अनेक वर्षांपासून मागणी

 गेल्या अनेक वर्षांपासून ग्रंथालयाची लवकरात लवकर दुरुस्ती करा, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा,  ग्रंथालयाच्या वेळेत बदल करा अादी मागण्या विद्यार्थ्यांमार्फत करण्यात येत होत्या. याप्रश्नी अनेक विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ प्रशासनाची भेट घेतली होती. या समस्येची दखल घेत मुंबई लाइव्हनं याबाबत बातमी प्रदर्शित केली होती. प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयाबाबत असणाऱ्या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील असं आश्वासन दिलं होतं. 


विद्यार्थ्यांना दिलासा 

अखेर मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये राजाबाई टॉवर येथे विद्यापीठाचे ग्रंथालय १६ नोव्हेंबरपासून सकाळी १०.३० ते रात्री ९.४५ पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दुसरा व चौथा शनिवार तसचं रविवार व इतर सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ५.४५ पर्यंत विद्यापीठाचं ग्रंथालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या या निर्णयामुळं अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. 


मुंबई विद्यापीठाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. परंतु सध्या विद्यापीठाच्या ग्रंथालयाची दुरावस्था झाली आहे. सध्या ग्रंथालयात केवळ ४ ते ५ पंखे असल्यानं विद्यार्थ्यांना उकाड्यात बसून अभ्यास करावा लागत आहे. त्यामुळे पंख्याची संख्या वाढवावी, बंद असलेली वायफाय सेवा पुन्हा सुरू करावी यांसह विविध मागण्या प्रलंबीत आहेत. या सर्व मागण्याही विद्यापीठ प्रशासनानं लवकरात लवकर पूर्ण कराव्यात 

- सौमित साळुंखे, एलएलएम विद्यार्थीहेही वाचा - 

विनाअनुदानित शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन

समायोजन होऊनही सेवेत न रुजू होणाऱ्या शिक्षकांचं वेतन बंद
संबंधित विषय
ताज्या बातम्या