कुर्ल्यात राहणारा स्वप्निल युपीएससी परीक्षेत मुंबईतून पहिला

  Kurla
  कुर्ल्यात राहणारा स्वप्निल युपीएससी परीक्षेत मुंबईतून पहिला
  मुंबई  -  

  यूपीएससी परीक्षेचा निकाल बुधवारी संध्याकाळी जाहीर झाला असून, कुर्ला परिसरात राहणारा स्वप्निल पाटील मुंबईतून पहिला, राज्यात तिसरा आणि भारतात 55 वा आहे.

  इंजिनिअर असलेल्या स्वप्निलने चौथ्या प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. स्वप्निल पाटील कुर्ल्यातील नेहरूनगरमध्ये आई-वडिलांसोबत राहतो. वडील पोलीस खात्यात सहाय्यक आयुक्त आहेत. स्वप्निलने शालेय शिक्षण घेत असताना त्याने आयएएस होण्याचे स्वप्न बाळगले होते. देशासाठी आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आपली इच्छा असल्याचे स्वप्निलने 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.