Advertisement

Colleges Reopens : ...तर महाविद्यालयातच विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम

कॅम्पस मध्ये लसीकरण कशा प्रकारे करावं याबाबत चर्चा सुरू आहे.

Colleges Reopens : ...तर महाविद्यालयातच विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहीम
संग्रहित फोटो
SHARES

राज्यातील अनेक महाविद्यालये (Collages) आजपासून सुरू झाली आहेत. यासंदर्भातच राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी (Vaccination Drive) विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत (student Vaccine) राजेश टोपे यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday samant) यांच्याशी चर्चा केली. या चर्चे दरम्यान राजेश टोपे म्हणाले की, महाविद्यालये सुरू झाल्यामुळे आता यापुढे १८ वर्षांच्या पुढील विद्यार्थ्यांचं लसीकरण आपल्याला करावं लागेल. त्यासाठी विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. तसंच पोस्ट व्हॅक्सिनेशन बाबतही काळजी घ्यायची आहे. या दृष्टीकोनातून जे किट आहेत ते आपल्याला उपलब्ध करुन द्यावे लागणार.

यासंदर्भात उदय सामंत म्हणाले की, आरोग्य विभाग संचालिका अर्चना पाटील यांच्यासोबत सुद्धा एक बैठक आहे. यामध्ये कॅम्पस मध्ये लसीकरण कशा प्रकारे करावं याबाबत आम्ही चर्चा करत आहोत. जेणेकरून कॅम्पस मध्येच विद्यार्थ्यांना पहिला डोस दुसरा डोस देता येतील. ही मोठी मोहीम आम्ही पुढच्या आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याच्या विचारात आहोत.

तसंच आजपासून कॉलेजेस सुरू होत नसतील तर त्यांनी २१, २२ तारखेला कॉलेज सुरू करावेत. मात्र, २५ तारखेच्या आत हे कॉलेज सुरू केले पाहिजेत. काही त्रुटी असतील तर शासन सुद्धा त्यांना मदत करेल, असं उदय सामंत म्हणाले.

दरम्यान, कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. त्याबाबत बोलताना टोपे म्हणाले की, ज्या प्रकारे आपण सर्वकाही सुरु केलं आहे. जगात सर्वत्र तिसरी लाट आलेली आहे. मात्र, ती लाट सौम्य होती आणि त्याची दाहकता तेवढी दिसली नाही. असं टोपे यांनी सांगितलं.

मुंबई लोकलचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री मुंबई लोकलबाबत बारकाईने लक्ष ठेवून आहेत. लोकलबाबत प्रवाशांचे निर्बंध कसे असावेत याकडे त्यांचं लक्ष आहे. टास्क फोर्ससोबत बोलून ते याबाबतचा निर्णय घेतील, असं राजेश टोपे बोलले.  

तसंच दिवाळीनंतर काही दिवसांनी जर पॉझिटिव्हिटी रेट वाढला नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली नाही. तर मुख्यमंत्री सर्वांसाठी लोकलसेवा सुरु करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ शकतील, अशी शक्यताही टोपे यांनी व्यक्त केली आहे.



हेही वाचा

Colleges Reopen : मुंबईतील महाविद्यालयांसाठी 'या' आहेत पालिकेच्या गाईडलाईन्स

Colleges Reopen : लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार का?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा