Advertisement

Colleges Reopen : मुंबईतील महाविद्यालयांसाठी 'या' आहेत पालिकेच्या गाईडलाईन्स

राज्यासह मुंबईतली सर्व महाविद्यालये बुधवार २० ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष सुरू होत आहेत.

Colleges Reopen : मुंबईतील महाविद्यालयांसाठी 'या' आहेत पालिकेच्या गाईडलाईन्स
SHARES

राज्यासह मुंबईतली सर्व महाविद्यालये (colleges Reopen) बुधवार २० ऑक्टोबर पासून प्रत्यक्ष सुरू होत आहेत. मुंबई महानगरपालिकेनं (BMC) या ऑफलाइन वर्गांसाठी (Oflien classes) मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांमध्ये विशेषत: कोविड-१९ सुरक्षिततेसंदर्भातील सूचनांचा समावेश आहे.

कोरोना काळानंतर सुमारे दीड वर्षांच्या गॅपनंतर कॉलेज प्रत्यक्ष सुरू होत आहेत. काही ठिकाणी, विशेषत: ग्रामीण भागात वर्ग सुरू झाले असले तरी खऱ्या अर्थाने सर्व महाविद्यालये बुधवार २० ऑक्टोबर पासून सुरू होत आहेत.

मुंबई महानगरपालिकेनं कॉलेज सुरू होण्याकरिता हिरवा कंदिल दाखवला असला तर अंतिम निर्णय कॉलेजांनी तेथील स्थानिक परिस्थितीनुसार घ्यायचा आहे.

पालिकेच्या गाईडलाईन्स

१) महाविद्यालयांचे वर्ग केवळ ५० टक्के क्षमतेनेच उघडतील.

२) तूर्त केवळ दोन व्हॅक्सिन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहण्याची परवानगी आहे. १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी हा नियम नाही.

३) जर विद्यार्थ्यांचे दोन व्हॅक्सिन डोस पूर्ण झाले नसतील, तरी त्यांना कॉलेजला यायचे असेल तर त्या महाविद्यालयाची ही जबाबदारी आहे की जवळच्या पालिकेच्या वॉर्ड ऑफिसशी संपर्क साधून अशा विद्यार्थ्यांसाठी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विशेष लसीकरण कार्यक्रम आखावा.

४) वर्गांमध्ये ऑफलाइन उपस्थिती बंधनकारक नाही. मात्र वर्गात न येणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन क्लास अटेंड करावेत.

५) ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा मिश्र पद्धतीनं अध्यापन सुरू ठेवावे.

कॉलेज कोणत्या वर्गांसाठी उघडावीत, हे बंधनकारक नसले तरी मुंबईतील काही महाविद्यालयांनी पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमाचे वर्ग सुरुवातीला प्राधान्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.हेही वाचा

Colleges Reopen : लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार का?

२० ऑक्टोबरपासून महाविद्यालय सुरू, ‘या’ आहेत गाईडलाईन्स

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा