हॉलतिकीटाचा तिढा अखेर सुटला..

 Vidhan Bhavan
हॉलतिकीटाचा तिढा अखेर सुटला..

नरिमन पॉईंट – मुंबई विदयापीठातील गोंधळ संपता संपत नाहीये. 25 ऑक्टोबरपासून टीवायबीकॉमची परिक्षा सुरू होतेय. यासाठी विद्यार्थ्यांना हॉलतिकीट देण्यात आलेल. पण हॉलतिकीटावर 21 आणि 22 तारिख छापलेली असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मात्र चांगलाच गोंधळ उडालेला. नेमकी परिश्रा कधी सुरू होणार असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला. यावर्षी टीवायबीकॉमच्या परिक्षेसाठी एकूण 80 हजार विदयार्थी आहेत. त्यामुळे विदयापीठाच्या हलगर्जीपणाचा नाहक त्रास विदयार्थ्यांना सहन करावा लागला. या सगळ्या गोंधळानंतर विद्यापिठाने नवीन हॉलतिकीट वेबसाईटवर अपलोड केलं.वेळेपत्रकानुसारच परिक्षा घेण्यात येईल अशी माहिती विदयापीठाचे कुलसचिव अहमद खान यांनी दिली.

Loading Comments