Advertisement

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी मुख्याध्यापकांची कार्यशाळा


अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी मुख्याध्यापकांची कार्यशाळा
SHARES

दहावीची परीक्षा संपली की विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालयांची घाई होते ती अकरावीच्या प्रवेशासाठी. सध्या मुंबईत अकरावीच्या प्रवाशांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रकिया राबविण्यात येते. ही अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया मुंबईमध्ये यशस्वी व्हावी, यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून २६ ते २८ मार्चदरम्यान मार्गदर्शनपर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी मुंबईतील सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना हजर राहण्याचे निर्देश उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.


विद्यार्थ्यांचा गोंधळ थांबवण्यासाठीचे हे पाऊल

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत बऱ्याच वेळा पालक आणि विद्यार्थ्यांचा आजही गोंधळ उडतो. यासाठी विद्यार्थी व पालकांच्या मार्गदर्शनपर सभा घेऊन मुख्याध्यापकांनी या प्रक्रियेबाबत योग्य मार्गदर्शन करावं. या प्रक्रियेचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची जबाबदारी महत्त्वाची असते. याच पार्श्वभूमीवर मुख्याध्यापकांना या सगळ्या रक्रियेची इत्यंभूत माहिती असणं आवश्यक असल्यानं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं अाहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रकियेदरम्यान विद्यार्थ्यांचा गोंधळ थांबवण्यासाठी शिक्षण विभागानं हे ठोस पाऊल उचललं अाहे.


इथे होईल कार्यशाळा

दक्षिण मुंबई आणि पश्चिम मुंबईतील मुख्याध्यकांची कार्यशाळा अनुक्रमे सकाळी १० आणि दुपारी २ वाजता खालसा कॉलेज आणि निर्मला कॉलेज इथं आयोजित करण्यात आली आहे. उत्तर मुंबई आणि नवी मुंबईतील मुख्याध्याकांच्या कार्यशाळेचं आयोजन २७ मार्च रोजी करण्यात आलं आहे. ठाणे आणि कल्याण महानगरपालिका क्षेत्रातील कार्यशाळा २८ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक विभागानं दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा