पुन्हा सुरांना लाभणार स्वप्नांचे पंख

काही रिअलिटी शोजनी आपला वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे. यात ‘सूर नवा ध्यास नवा – स्वप्न सूरांचे, स्वप्न सार्‍यांचे’ या शोनंही आपला ठसा उमटवला आहे. आता या शोचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं असल्यानं पुन्हा एकदा जणू सुरांना स्वप्नांचे पंख लाभले आहेत.

SHARE

काही रिअलिटी शोजनी आपला वेगळा चाहता वर्ग तयार केला आहे. यात ‘सूर नवा ध्यास नवा – स्वप्न सूरांचे, स्वप्न सार्‍यांचे’ या शोनंही आपला ठसा उमटवला आहे. आता या शोचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं असल्यानं पुन्हा एकदा जणू सुरांना स्वप्नांचे पंख लाभले आहेत.

‘सूर नवा ध्यास नवा – स्वप्न सूरांचे, स्वप्न साऱ्यांचे’ हा शो नव्या रूपात आणि नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्या पर्वात धमाल केल्यानंतर नव्या पर्वातही हा जो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या पर्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ५ ते ५५ वयोगटातील सुरवीर यात सहभागी होणार आहेत. यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुरवीर शोधण्यात आले आहेत. निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये मेगा ऑडिशनची फेरी घेण्यात आली. त्यामधून २२ सुरवीरांची निवड झाली आहे. मागील पर्वाप्रमाणेच स्पृहा जोशी सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर या सुरवीरांची पारख करण्यासाठी त्यांच्यासोबत महेश काळे आणि अवधूत गुप्ते असणार आहेत.

संगीत आणि मराठी माणसाचं अतूट नातं आहे. संगीताला रसिकांनी नेहेमीच आपल्या हृदयात जपलं आहे. महाराष्ट्रानं भारतीय संगीत क्षेत्राला आजवर अनेक दर्जेदार गायक दिले आहेत. सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनामध्ये या पर्वाबद्दलची खूप उत्सुकता होती. ऑडिशन्सच्या दमदार भागांनंतर कार्यक्रमाबद्दलची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. मेगा ऑडिशनमधून निवड झालेल्या २२ स्पर्धकांमध्ये आता विजेतेपद मिळविण्याची चुरस बघायला मिळणार आहे.

‘सूर नवा ध्यास नवा’च्या नव्या पर्वाबाबत महेश काळे म्हणाला की, यात ५ ते ५५ हा वयोगट असल्यामुळं बर्‍याच वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतील. कारण यामध्ये उत्सुफुर्ततेची स्पर्धा आहे. संयमासोबत आणि ऊर्जेची स्पर्धा आहे परिपक्वतेसोबत. त्यामुळंच वेगवेगळ्या गोष्टी अनुभवाला मिळणार आहेत. लोकांच्या गाण्यासोबत हळहळू त्यांचे आयुष्यदेखील उलघडत जाईल असंही महेशनं सांगितलं. अवधूत गुप्तेही आपल्या मनातील भावना व्यक्त करत म्हणाला की, सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे आणि म्हणूनच या वेळेस एक आगळीवेगळी थीम घेऊन पुढचं पाऊल उचलण्यात आलं आहे. अशा प्रकारचा वयोगट, अशाप्रकारची थीम याआधी मराठीच नव्हे तर भारतातील कुठल्या वाहिनीवर झाली असेल असं मला वाटत नाही.हेही वाचा -

ही अभिनेत्री बनली लेखिका

स्टार चमकले आणि जिम ट्रेनर बनला पडद्यावरचा स्टार
संबंधित विषय
ताज्या बातम्या