पुन्हा उडणार थ्री इडियट्सची धमाल!

Churchgate
पुन्हा उडणार थ्री इडियट्सची धमाल!
पुन्हा उडणार थ्री इडियट्सची धमाल!
See all
मुंबई  -  

काही सिनेमे असे असतात, जे कितीही जुने झाले तरीही पुनः पुन्हा पहावेसे वाटतात. अशाच सिनेमापैकी एक म्हणजे थ्री इडियट्स. आमीर खान , आर माधवन आणि शरमन जोशी यांच्य़ा त्रिकुटानं या  सिनेमात धमाल उडवली होती. 2009 साली प्रदर्शित झालेल्या थ्री इडियट्सची प्रॆक्षकांच्या मनावरील जादू अद्यापही कायम आहे. म्हणूनच आजही हा सिनेमा तेवढ्याच आवडीनं पाहिला जातो. पण आता तुम्हाला केवळ जुना थ्री इडियट्स पाहून समाधान मानण्याची गरज नाही. कारण या सुपरडुपर हिट सिनेमाचा सिक्वेल लवकरच येण्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. 

 तशी ही चर्चा काही नवी नाही. काही महिन्यांपूर्वीच राजकुमार हिरानींच्या  'साला खडूस' सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी आमिरने ह्या बातमीची हिंट दिली होती. थ्री इडियट्सच्या दुस-या भागाचे कथानक राजकुमार हिरानींकडे तयार असून, सध्याच्या कामातून फ्री झाल्यावर ते या सिनेमाच्या शूटिंगचा मुहुर्त करतील, अशी शक्यता आहे. तसंच थ्री इडियट्सच्य पहिल्या भागातील कलाकार दुस-या भागतही असतील, अशी चर्चा बॉलीवूडमध्ये आहे. 

 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.