बॉलिवुड अॅक्टर्सची पुढची पिढी पदार्पणासाठी सज्ज!

Mumbai
बॉलिवुड अॅक्टर्सची पुढची पिढी पदार्पणासाठी सज्ज!
बॉलिवुड अॅक्टर्सची पुढची पिढी पदार्पणासाठी सज्ज!
बॉलिवुड अॅक्टर्सची पुढची पिढी पदार्पणासाठी सज्ज!
बॉलिवुड अॅक्टर्सची पुढची पिढी पदार्पणासाठी सज्ज!
बॉलिवुड अॅक्टर्सची पुढची पिढी पदार्पणासाठी सज्ज!
See all
मुंबई  -  

बॉलिवुड सेलिब्रिटि म्हटलं की त्यांच्या राहण्यापासून ते त्यांच्या लाइफस्टाईलबद्दल जाणून घ्यायला प्रत्येकजण उत्सुक असतो. साहजिकच या सेलिब्रिटिंच्या मुला-मुलींबद्दलही चांगलंच आकर्षण निर्माण होतं. बॉलिवुड किंग खान शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर, सैफ अली खानची मुलगी सोहा अली खान, चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक हे सर्व २൦१७ मध्ये 'सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन' ठरल्या आहेत. यांच्या अफेअर्सपासून ते अगदी त्यांच्या कपड्यांपर्यंतची चर्चा चांगलीच रंगलेली असते. हे सर्व स्टार किड्स भावी सुपरस्टार असणार यात काही शंका नाही. आणि त्याची सुरुवातही झोकात झाली आहे. हे सर्व स्टार किड्स चित्रपट सृष्टीतल्या पदार्पणासाठी सज्ज झाले आहेत.

जान्हवी कपूर


गेल्या काही दिवसांपासून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरबद्दल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. जान्हवी कोणत्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार? यावर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. जान्हवी कपूर लवकरच करण जोहरच्या हिंदी 'सैराट' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

श्रीदेवीची मुख्य भूमिका असणारा 'मॉम' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान श्रीदेवीनं मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी श्रीदेवी म्हणाली की, "माझी इच्छा आहे की जानवीनं लग्न करावं. तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण करावं, असं मला वाटत नाही. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून पाय जमवणं इतकं सोपं नसतं. त्यामुळे बॉलिवूडपासून तिला लांब ठेवायचं होतं. पण मला माझे विचार तिच्यावर थोपायचे नाहीत. त्यामुळे मी तिच्या निर्णयाचा मान ठेवते."


सारा आली खान


सारा अली खान अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी आहे. सारा अभिषेक कपूरच्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'केदारनाथ' या चित्रपटात ती सुशांत सिंह राजपूतसोबत दिसणार आहे. सारा करण जोहरचा चित्रपट 'स्टुडंट ऑफ द इयर-2' या चित्रपटात झळकणार आहे, असा अंदाज होता. पण अखेर 'केदारनाथ' चित्रपट तिच्या हाती लागला.

साराच्या बॉलिवूड पदार्पणावर सैफ अली खान बोलतो की, "साराच्या चित्रपट सृष्टीतील वाटचालीसाठी मी खूप उत्सुक आहे. तिच्या करीअरबद्दल जेवढा मी उत्सुक आहे, तेवढाच मी चिंतितही आहे. चित्रपट क्षेत्रात करीअर करण्याच्या तिच्या निर्णयाशी मी सहमत आहे. आम्ही कधी कधी खूप गोष्टींवर चर्चा करतो. तिला चित्रपटांबद्दल काय वाटतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो."


सुहाना खान


काही महिन्यांपूर्वी शाहरूख खानची मुलगी सुहाना खानचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यात सुहाना शेक्सपिअरच्या नाटकात अभिनय करताना दिसली. त्यात तिचा अभिनय खरच कौतुकास्पद होता. त्यामुळे वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यास सुहाना तयार आहे, असंच म्हणावं लागेल. लवकरच सुहाना करण जोहरच्या चित्रपटातून पदार्पण करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. करण जोहरही स्क्रिप्टवर काम करतोय, असं बोललं जातंय.

पण सुहानाच्या बॉलिवूड पदार्पणासंदर्भात शाहरूख खानचं वेगळचं मत आहे. "सुहानानं आधी शिक्षण पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यानंतर बॉलिवुडमध्ये पदार्पण करण्याचा विचार करता येईल." तसंच "सुहाना एखाद्या पार्टीला गेली, याचा अर्थ ती बॉलिवुडमध्ये पदार्पण करणार असा होत नाही," हे सुद्धा शाहरुखनं स्पष्ट केलं.


अनन्या पांडे


अनन्या पांडे ही अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर-2' या चित्रपटातून अनन्या बॉलिवुडमध्ये पाऊल ठेवणार आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर-2' या चित्रपटासाठी जान्हवी आणि सारा यांच्या नावाची चर्चा होती. पण अनन्याच्या हाती हा चित्रपट लागला.

चंकी पांडे म्हणतो, "अनन्याला बॉलिवुडमध्ये करीअर करण्याची इच्छा असल्याचं तिनं मला सांगितलं होतं. माझा तिला पाठिंबा आहे. तिनं स्वत:च्या हिंमतीवर नाव कमवावं, हीच माझी इच्छा आहे".

पलक तिवारी

पलक टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे. अहाना खान, जान्हवी कपूर आणि सारा खान यांच्या तुलनेत पलकही तेवढीच बोल्ड आणि स्टायलिश आहे. 'तारे जमीन पर' चित्रपटातील स्टार दर्शील सफारीसोबत पलक एक चित्रपट करणार आहे. लवकरच चित्रपटाचे शुटिंग सुरू होईल.
हेही वाचा

'जग्गा जासूस'मधून गोविंदा कटाप


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.