'जग्गा जासूस'मधून गोविंदा कटाप

 Mumbai
'जग्गा जासूस'मधून गोविंदा कटाप
Mumbai  -  

'जग्गा जासूस' सिनेमात गोविंदा पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार होता. पण गोविंदाच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. पण आता त्याचा भाग सिनेमातून वगळण्यात आल्याचं समोर येत आहे. एका खास भूमिकेत गोविंदा सगळ्यांच्या भेटीला येणार होता. काही दिवसांपूर्वी गोविंदाचा एक फोटोही वायरल झाला होता. पण आता हे दृश्यच वगळण्यात आल्याचं बोललं जातंय.

दिग्दर्शक अनुराग बासूने या संदर्भात माहिती देताना सांगितलं की, चित्रपटातल्या एका भूमिकेसाठी गोविंदाला घेण्यात आले होते. पण आता चित्रपटातून ती भूमिकाच वगळण्यात आली आहे. हा सिनेमा बनवायला खूप वेळ लागला. प्रत्येक वेळी चित्रपटातील कथा बदलत गेली. कथानक बदलल्यामुळे गोविंदाची भूमिका कट करण्यात आली आहे.

जग्गा जासूस सिनेमात रणबीर कपूर आणि कतरीना कॅफ पुन्हा एकदा दिसणार आहेत. रणबीर जग्गा नावाच्या एका गुप्तहेराची भूमिका बजावत आहे.

Loading Comments