Advertisement

5 महाविद्यालये आयएनटी अंतिम फेरीत


5 महाविद्यालये आयएनटी अंतिम फेरीत
SHARES

कालिना - 44 व्या इंडीयन नँशनल थिएटर ह्या मराठी एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल लागला असून एकुण 20 महाविद्यालयांपैकी 5 महाविद्यालये अंतिम फेरीत दाखल झाली आहेत. त्यात किर्ती महाविद्यालयाची लास्ट ट्राय, रुईया महाविद्यालयाची लैला आँन द राँक्स, सी.एच.एम महाविद्यालयाची विभवांतर, जोशी बेडेकर महाविद्यालयाची असणं नसणं, सिडनँहम महाविद्यालयाची श्यामची आई या एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. दिवंगत प्रविण जोशी यांच्या स्मरणार्थ आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत पूर्व प्राथमिकमध्ये 34 महाविद्यालयांचा समावेश होता. पण त्यातून उत्तम अशा 20 एकांकिका प्राथमिक फेरीत आल्या असून त्यातून या 5 एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाल्याने चुरस वाढण्याची शक्यता आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा