5 वेळा प्रेमात पडल्या रेखा!


SHARE

बॉलिवूड कारकिर्दीत वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वात जास्त चर्चेत राहिलेल्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे रेखा. रेखा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरल्या आहेत. रेखा यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यांचे नाव अनेकांसोबत जोडले गेले. पेपर, मॅगझिन्समध्ये त्यांच्या अफेअर्सचीच चर्चा असायची. पण रेखा यांनी कधीच ते स्वीकारलं नाही.


1) अमिताभ बच्चन


सौजन्य

बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहाणी ही जग जाहीरच आहे. 'दो अनजाने' या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान अमिताभ आणि रेखा यांची भेट झाली. त्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढू लागली. पण अमिताभ यांचे लग्न झाले होते. पण तरीही ते रेखाच्या इतक्या प्रेमात होते, की ते लवकरच लग्न करणार, अशी चर्चा सुरू झाली. पण जया बच्चन यांच्यासाठी अमिताभ यांनी रेखाशी लग्न केलं नाही. सिलसिला हा रेखा आणि अमिताभ यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीच एकत्र काम केलं नाही


2) साजिद खान


सौजन्य

साजिद हे महबूब खान यांचे चिरंजीव आणि महबूब स्टुडिओचे मालक होते. रेखा आणि साजिद यांची भेट एका चित्रीकरणादरम्यान झाली. त्यांना रेखाचे राहणीमान आणि काम पसंत पडले. त्यांच्यात जवळीक वाढली. पण याच काळात रेखा यांच्या आयुष्यात नवीन निश्चल यांची एन्ट्री झाली. त्यामुळे साजिद यांच्यापासून त्या दुरावल्या.


3) नवीन निश्चल


सौजन्य

रेखा यांनी सावन भादो (१९७०)या सिनेमाद्वारे मुख्य अभिनेत्री म्हणून करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात नवीन निश्चल त्यांचे हिरो होते. चित्रीकरणादरम्यान रेखा यांना नवीन आवडू लागले. पण नवीन यांना रेखासोबतच्या नात्यात काहीच रूची नव्हती. सावन भादो चित्रपटाचे चित्रिकरण संपताच रेखा यांचे एकतर्फि प्रेम संपुष्टात आले


4) जितेंद्र

सौजन्य


रेखा यांचे नाव जितेंद्र यांच्यासोबत देखील जोडले गेले. त्याकाळात जितेंद्र बॉलिवूडमधील आघाडीचे अभिनेते होते. पण जितेंद्र आणि रेखा यांचे नाते पुढे जाण्यापूर्वीच शोभा यांची एन्ट्री झाली. त्यानंतर जितेंद्र यांनी रेखाच्या आयुष्यातून काढता पाय घेतला.


5) विनोद मेहरा

सौजन्य


विनोद मेहरा आणि रेखा यांच्या अफेअरची चर्चाही चांगलीच रंगली. या दोघांनी गुपचुप लग्न केल्याचं देखील बोललं जात होतं. पण विनोद मेहरा यांच्या आई रेखाला पसंत करत नव्हत्या. त्यामुळे रेखा आणि विनोद यांच्यात दुरावा निर्माण झालाहेही वाचा

'रेखा' नावाचा 'चित्रपट'!


संबंधित विषय