सलमान खान @ 51

 Pali Hill
सलमान खान @ 51
सलमान खान @ 51
सलमान खान @ 51
सलमान खान @ 51
See all

मुंबई - बॉलिवूडचा सुलतान अर्थात अभिनेता सलमान खान. यांनं मंगळवारी आपला 51वा वाढदिवस साजरा केला. यावेळी पनवेलच्या फार्महाउसमध्ये त्यानं आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त यंदा त्याच्या फार्महाउसला आकर्षक रोषणाईही केली होती.

सलमान खानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सोमवारी रात्रीच त्याच्या मित्र आणि परिवाराने पनवेल इथल्या फार्महाउसवर गर्दी केली. घड्याळाचा काटा जसा 12 वर सरकला तोच सर्व सेलिब्रिटींनीही हजेरी लावली. या वेळी सलमानच्या पार्टीत आलेल्या प्रत्येकाने काळ्या रंगाचा पेहराव केला होता. तर दुसरीकडे सलमानच्या चाहत्यांनी सकाळपासूनच त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गर्दी केली होती.

Loading Comments