Advertisement

आशा भोसले यांचा वाढदिवस


आशा भोसले यांचा वाढदिवस
SHARES

लावणी पासून भक्तिगीतापर्यंत आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतापासून वेस्टर्न म्यूजिकपर्यंत, सर्वत्र आपल्या गायकीचा ठसा उमटवणाऱ्या आशा ताई म्हणजेच आशा भोसले यांचा ८ सप्टेंबर हा वाढदिवस! त्या ८४ वर्षांच्या झाल्या. ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगलीमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे कलाकार आणि शास्त्रीय संगीत गायक. आशा भोसले जेव्हा ९ वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांच्या वडिलांनी म्हणजेच दीनानाथ मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर त्यांचं पूर्ण कुटुंब पुणे, कोल्हापूर आणि मग मुंबई येथे आलं. त्यांची बहीण लता मंगेशकर आणि त्यांनी स्वतः कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्यासाठी गाणी गाण्यास आणि सिनेमात काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी चित्रपट गायनाची सुरुवात 'माझा बाळ' या चित्रपटापासून केली. १९५० च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटातही अनेक गाणी गायली.

वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी ३१ वर्षीय गणपतराव भोसले या इसमाशी कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं. त्यांना ३ मुलंही झाली. हेमंत, आनंद आणि वर्षा अशी त्यांची नावं. मोठा मुलगा हेमंत पायलट, वर्षा एका वृत्तपत्रासाठी लेखन करत होती तर आनंद हा व्यावसायिक असून त्याने चित्रपट दिग्दर्शनाचा अभ्यास केला आहे. ते सध्या आशा ताईंचं काम बघतात. २०१२मध्ये आशाताईंच्या मुलीने आत्महत्या केली होती.

१९४३ पासून आशाताईंनी गायनाला सुरवात केली आणि अजूनही त्या सिनेमात गाण्यांना आपला आवाज देत आहेत. आतापर्यंत आशा भोसले यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. ज्यात राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार त्याचबरोबर जीवन गौरव पुरस्कारांचा समावेश आहे.


आशा भोसले यांची गाजलेली मराठी गाणी :

मनमोहना तू राजा स्वप्नातला

माझ्या रूपाचं चांदणं फुललं

ऋतू हिरवा

एकाच या जन्मी जणू

सांज ये गोकुळी

झुंजूर मुंजूर  

फुलले रे क्षण माझे

मला काय झाले कळेना

नकळत असे ऊन

भोळी बाई गं मी




आशा भोसले यांची गाजलेली हिंदी गाणी :

पिया तू...अब तो आजा

आईये मेहरबां

इन आखोंकी मस्ती

चुरा लिया है तुमने जो दिल को

अभी ना जाओ छोडकर

दिल चीझ क्या है

हंगामा हो गया

दम मारो दम

खतुबा

जरा सा झूम लू मैं




आशा भोसले यांच्यावरील पुस्तके :

आशा भोसले : नक्षत्रांचे देणे (संपादक - वामन देशपांडे, मोरया प्रकाशन)

खय्याम (विश्वास नेरुरकर)

नामांकित (अनघा केसकर)

मंगेशकर - स्वरांचा कल्पवृक्ष (प्रभाकर तांबट)

सुरा मी वंदिले (कृष्णकुमार गावंड)



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा