'नशीबवान'च्या पोस्टरवरून उद्भवला नवा वाद


SHARE

अमोल गोळे दिग्दर्शित आणि निर्मित 'नशीबवान' या सिनेमाचं पोस्टर नुकतंच सोशल मिडीयावर लॉन्च करण्यात आलं. त्यानंतर लगेचच एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल गोळे यांनी लेखकाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लेखिका कविता महाजन यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकत अमोल गोळे यांच्यावर फसवणुकीचा अारोप केला अाहे. अमोल गोळे यांनी हिंदी लेखक उदय प्रकाश यांची फसवणूक केल्याचा दावा कविता महाजन यांनी केला अाहे. ही गोष्ट लाजिरवाणी असून अाम्ही या गोष्टीचा निषेध करत अाहोत, असंही त्यांनी म्हटलं अाहे.लेखकाचेही टीकास्त्र

कविता महाजन यांच्यासह लेखक उदय प्रकाश यांनीही याबाबत एक पोस्ट शेअर करत या सर्व प्रकरणाचा खुलासा केला अाहे. 'दिल्ली की दिवार' या कथेवर मराठीमध्ये वेब सिरिज बनविण्यासाठी माझ्याकडून ५० हजार रुपयांना या कथेचे अधिकार विकत घेण्यात अाले होते. पण अाजतागायत मला हे मानधनही मिळाले नाही. पण अाता त्या कथेवर अाधारित मराठीत संपूर्ण चित्रपट तयार केला अाहे. मात्र त्यात कुठेही लेखकाचा उल्लेख करण्यात अालेला नाही, असा अारोप लेखक उदय प्रकाश यांनी केला अाहे. या पोस्टमध्ये मात्र उदय प्रकाश यांनी दिग्दर्शकाचे नाव घेतले नसले तरी नशीबवान सिनेमाचे पोस्टर शेअर केले अाहे.अमोल गोळे यांच्याकडून सारवासारव

या वादावर पडदा टाकण्यासाठी अमोल गोळे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली अाहे. केवळ गैरसमजातून हा वाद उद्भवल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले अाहे.


कोण अाहेत अमोल गोळे?


अमोल गोळे यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. या आधी अमोल गोळे यांनी कथा-पटकथा-संवाद अशा अनेक भूमिका पार पाडल्या होत्या. त्यांनी 'रंगा पतंगा' या सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमाला २०१६ चा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट अांतरराष्ट्रीय सिनेमाचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांनी स्टेनली का डब्बा, एलिझाबेथ एकादशी अशा काही सिनेमांसाठी सिनेमॅटोग्राफी केली होती.


हेही वाचा - 

इंटरटेन्मेटचा 'बिग बॉस' आता मराठीत!

प्रियांका चोप्राचा तिसरा मराठी सिनेमा!


संबंधित विषय