आय एम बॅड बॉय - शाहरुख खान

Pali Hill, Mumbai  -  

अंधेरी - आय एम अ बॅड बॉय. हे बोल आहेत बॅड बॉय शाहरुखचे. रिअल लाईफमध्येही बॅड बॉय असल्याचं खुद्द शाहरुखनंच कबूल केलंय. रोमॅटिक हिरो अशी इमेज असलेल्या शाहरुखचे हे बोल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण शाहरुखला त्याच्या बॅड बॉयच्या इमेजचा अभिमान आहे. रईस या चित्रपटाचा ट्रेलर यशराज स्टुडिओमध्ये प्रदर्शित झाला. या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शाहरुखनं हे वक्तव्य केलं.

25 जानेवारी 2017ला शाहरुखचा बहुप्रतिक्षित रईस हा चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटात शाहरुख खलनायकाची भूमिका साकारतोय. गुन्हेगार अब्दुल लतिफच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. यापूर्वी डर, अंजाम, डॉन या चित्रपटात शाहरुखनं खलनायकाची भूमिका साकारलीय. पण या वेळी शाहरुखची खलनायकाची भूमिका जरा हटके आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबात चांगलीच उत्सुकता आहे.

Loading Comments