मयुर वैद्य यांच्या नृत्य संस्थेचा 'आमद' रसिकांच्या भेटीला

 Parel
मयुर वैद्य यांच्या नृत्य संस्थेचा 'आमद' रसिकांच्या भेटीला
Parel, Mumbai  -  

परळ - दामोदर हॉल मध्ये 20 जानेवारीला 'मयुर वैद्य आर्ट टेंपल' या संस्थेचा वार्षिक समारंभ 'आमद' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या समारंभाच्या पहिल्या भागात संस्थेचे विद्यार्थी तीनताल, झपताल, एकताल, रूपक, मत्त अशा तालांत आपले कथ्थकचे सादरीकरण करतील. तर, गुरु मयूर वैद्य ही याप्रसंगी शुद्ध कथ्थक नृत्याचं सादरीकरण करतील. समारंभाचा दुसरा भाग हा प्रेक्षकांसाठी पर्वणीच असणारा आहे. कारण, दुसऱ्या भागात भारतीय पौराणिक कथेवर आधारित असणाऱ्या आणि कथ्थक नृत्यशैलीत नृत्यमांडणी केलेल्या 'दशावतार' या नृत्यनाटिकेचे सादरीकरण होणार आहे. प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक मयुर वैद्य यांची 'मयुर वैद्य आर्ट टेंपल' या संस्थेतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.

Loading Comments