दीनानाथ मंगेशकरांचा 75 वा स्मृतीदिन सोहळा संपन्न

Kings Circle
दीनानाथ मंगेशकरांचा 75 वा स्मृतीदिन सोहळा संपन्न
दीनानाथ मंगेशकरांचा 75 वा स्मृतीदिन सोहळा संपन्न
See all
मुंबई  -  

दीनानाथ मंगेशकर यांचा 75 वा स्मृतिदीन सोहळा सोमवारी किंग्ज सर्कल, येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान हृदयेश आर्ट्स यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात अनेकांना गौरवण्यात आले.

दिनानाथ मंगेशकर पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे

अमीर खान - (चित्रपट 'दंगल')
कपिल देव - (खेळ - क्रिकेट)
विश्वनाथ कराड - (समर्पित जीवन गौरव पुरस्कार)
सावली केअर सेंटर कोल्हापूर - (समाज सेवा)
विजया राजाध्यक्ष - (वाग्विलासिनि पुरस्कार)
कौशिकी चक्रवर्ती - (संगीत सेवा)
आशालता वाबगांवकर - (प्रदीर्घ नाट्यसेवा)
अमर फोटो स्टुडिओ (उत्कृष्ट नाट्यनिर्मिती - मोहन वाघ पुरस्कार)
वैजयंतीमाला बाली - (इंडियन थिएटर अँड सिनेमा)
उदय निरगुडकर (पत्रकारिता - श्रीराम गोगटे पुरस्कार)

पत्रकारिता,समाजसेवा,नाटक निर्मिती, चित्रपट,खेळ,संगीत अशा विविध क्षेत्रांत आपली छाप उमटवणाऱ्या कलाकारांचा सन्मान सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आला. गेल्या 28 वर्षांपासून परंपरागत चालू असलेल्या दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानतर्फे या वर्षीचे पुरस्कार निवडक कलाकार/ कलावंतांना देण्यात आले. मंगेशकर घराण्याचे सूर जितके घराघरांत पोहोचले आहेत, तितकीच त्या घरांतील माणसे देखील लोकांपर्यंत पोहचली आहेत. यावेळी उषा मंगेशकर आणि लता मंगेशकर उपस्थित होत्या. 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.